आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री श्वेता मेननशी छेडछाड प्रकरणी काँग्रेस खासदाराविरोधात पोलिसात तक्रार दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्लम (केरळ) - मल्याळी अभिनेत्री श्वेता मेनन हिने काँग्रेसचे खासदार एन. पितांबरा कुरूप यांच्यावर छेडछाड केल्याचा आरोप केला असून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रेसिडेंट ट्रॉफी नौकानयन स्पर्धेच्या वेळी शुक्रवारी ही घटना घडल्याचे तिने सांगितले.
श्वेताने शुक्रवारी कोणाचेही नाव घेतले नव्हते आणि पोलिसात तक्रारही दिली नव्हती. एका लोकप्रतिनिधी छेड काढल्याचे तिने म्हटले होते. पोलिसांकडे तक्रार का केली नाही, असे विचारले असता, माझ्याशी गैरवर्तन करण्यात आले आहे. त्यामुळे अपमान झाल्याच्या भावनेने मी निराश झाले, असे तिने सांगितले होते.
या घटनेची माहिती तिने अभिनेते इनोसंट यांना दिली होती. मल्याळी चित्रपट संघटनेचे इनोसंट हे अध्यक्ष आहेत. गरज भासल्यास त्यांच्या सल्ल्यानुसार मी तक्रार दाखल करीन, असे श्वेताने सांगितले होते. आज (रविवार) तिने खासदार पितांबरा कुरूप यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मीडिया फुटेजनुसार काँग्रेसचे खासदार एन. पितांबरा कुरूप तिला स्पर्श करत असल्याचे दिसत आहे. आपले नाव समोर आल्यानंतर कोल्लमच्या 73 वर्षीय खासदाराने स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, हे पूर्णपणे चुकीचे आहे. मीडियात माझे नाव पुढे आल्याने मला स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय द्वेषातून हा प्रकार घडला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.