आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीची छेडछाड करणाऱ्या युवकांना फेसबुकमुळे अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - तेलगू अभिनेत्री अस्मिता करनानी हिच्या कारचा रस्ता अडवून अश्लील इशारे करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही "फेसबुक'वर पोस्ट केलेल्या फोटोंच्या आधारावर पकडण्यात आले आहे. अभिनेत्री अस्मिताने या पूर्ण घटनेदरम्यान आपल्या मोबाइलद्वारे आरोपींचे फोटो घेतले होते. त्यानंतर हे फोटो त्यांनी फेसबुकवर पोस्ट केले. २९ वर्षीय अभिनेत्री अस्मिताने २६ एप्रिल रोजी घडलेल्या छेडछाड प्रकरणातील युवकांचे फोटो फेसबुकवर टाकले होते. अस्मिताने या वेळी प्रसंगावधान दाखवत आरोपीचे मोबाइलमध्ये फोटो घेतले तसेच त्यांच्या दुचाकीचा नंबरचाही फोटो काढला. नंतर हे सर्व फोटो त्यांनी आपले फेसबुक अकाउंट व वाहतूक पोलिसांच्या फेसबुक पानावर हे फोटो पोस्ट केले होते. फेसबुकवर टाकलेले युवक व दुचाकी नंबरच्या फोटोला १० हजार लोकांनी शेअर केले होते. त्याच मुळे या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.