आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Wahida Rock At Jaipur Literature Festivel

अभिनेत्री वहिदा यांनी गाजवले जयपूर संमेलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - जयपूर साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांनी गाजवला. कडाक्याची थंडी आणि पावसातही साहित्यप्रेमींनी अमाप उत्साहात संमेलनस्थळी हजेरी लावली.
या वेळी वहिदा रहेमान म्हणाल्या, देवानंद आपले आवडते नायक आहेत. साहब, बीबी और गुलाम चित्रपटात सेकंड लीड रोलची ऑफर मिळाल्यानंतर त्यास नकार दिल्याचे त्या म्हणाल्या. तू एक चांगली अभिनेत्री असल्याने दुय्यम भूमिका स्वीकारू नको, असा सल्ला तेव्हा गुरुदत्त यांनी दिला होता. जावेद अख्तर यांनी महोत्सवातील तरुणांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले.
संमेलनात युद्ध आणि राजकारणाचा माणुसकीवर परिणाम या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखकांनी सहभाग नोंदवला. युद्धाच्या विध्वंसक परिणामांची जाणीव व्हावी यासाठी पुस्तकाच्या माध्यमातून जागृती होणे आवश्यक असल्याचे मत लेखकांनी व्यक्त केले.पाकिस्तानी लेखिका कामिला शामशी यांनीही परिसंवादात भाग घेतला. २००४-०५ दरम्यान इराकच्या मोहिमेत भाग घेतलेले अमेरिकी सैनिक केविन पॉवर्स यांनी अनुभवांवर पुस्तक लिहिल्याचे सांगितले.

घरी परत आलो तरी धोका टळलेला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, भारतीय वंशाच्या अमेरिकी लेखिका झुंपा लाहिरी यांनी गुरुवारी ५० हजार डॉलरचा साहित्य पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहता आले असते तर बरे झाले असते, असे त्यांनी रोमहून दूरध्वनीवर सांगितले. प्रकाशक कॅरोलीन न्यूबरी यांनी त्यांच्यावतीने पुरस्कार स्वीकारला.