आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगण्याने छळले होते!, असे म्हणत अदानी पॉवर लिमिटेडच्या व्हाइस प्रेसिडेंटची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- अदानी पॉवर लिमिटेड कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट दीपक रश्मी त्रिपाठी (61) यांनी शुक्रवारी रात्री जयपूर येथील 'हॉटेल फॉरच्यून'मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. त्रिपाठी अहमदाबाद येथील कार्यालयात कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी ते ऑफिस कामाने जयपूरमध्ये आले होते.

त्रिपाठी यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट सापडली आहे. जगण्याने खूप त्रस्त असल्याने आत्महत्या करत असल्याचे त्रिपाठी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

कशी मिळाली घटनेविषयी माहिती?
- जनरल मॅनेजर रजनीश पांडे यांनी त्रिपाठी यांना अनेकदा फोन केला. पण, त्यांना तो रिसिव्ह केला नाही.
- पांडे स्वत: जयपूर वेथील बाइस गोदाम सर्कलजवळी फॉरच्यून हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे हॉटेलच्या रुममध्ये त्रिपाठी मृत अवस्थेत आढळले.
- त्रिपाठी व पांडे शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या फ्लाइटने अहमदाबादला जाणार होते. त्यामुळे पांडे त्यांना सकाळी 6 वाजेपासून फोन करत होते.

त्रिपाठी यांनी‍ लिहिले होते, जगण्याने छळले आहे...
- त्रिपाठी यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. 'मी आयुष्याने खूप त्रस्त आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे.', असे चिठ्ठीत लिहिले आहे.
- 'माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार ठरवू नये. विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये', असेही चिठ्ठीत लिहिले आहे.
- पोलिसांनी त्रिपाठी यांचे पार्थिव एसएमएस हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.
बातम्या आणखी आहेत...