उज्जैन/इंदूर - महाकाल मंदिरात नागपंचमीनिमित्त नागचंद्रेश्वर दर्शनाच्या वेळी गोंधळ झाला. बुधवारी (ता.19) रात्री 10 वाजता चार क्रमांकाच्या एक्झिट गेटवर काही लोकांनी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी यांना थांबवल्याने त्यांनी एडीएमच्यासमोर एका पोलिस कर्मचा-याच्या श्रीमुखात लगावली. तसेच त्याची कॉलर पकडली. या दरम्यान बाचाबाचीत शिपायाच्या शर्टचे बटण तुटले. सूर्यवंशी यांच्या या वर्तनामुळे त्याला राग आला. त्यानेही अधिका-याला मारहाण केली आणि शिव्याही दिल्या. शिपायाचा आक्रमकता पाहून सूर्यवंशी ताळ्यावर आले. उपस्थित अधिका-यांनी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण मिटले.
प्रकरण काय होते ?
बुधवारी (ता.19) रात्री 10 वाजता महाकाल मंदिराच्या गेट नंबर चारवर महाकाल स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज दुबे काही पोलिस शिपायांसह तैनात होते. त्यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सूर्यवंशी काही लोकांसह आले आणि एक्झिट गेटने आत जात होते. त्यावेळी दुबे यांनी त्यांना रोखले. याने अप्पर जिल्हाधिकारी टीआईवर भडकले. दुसरीकडे पोलिस शिपाई भंवर लाल यांनी विचारले, तुम्ही कोण आहात? याला उत्तर देताना सूर्यवंशी म्हणाले, मी अप्पर जिल्हाधिकारी आहे. हे ऐकताच टीआय आणि पोलिस कर्मचा-यांनी दिलगिरी व्यक्त केली. यानंतर सूर्यवंशी आपल्या सहका-यांसह आत निघून गेले.
शिपायाची कॉलर पकडली...
साधारण 10 मिनिटानंतर सूर्यवंशी अवधेश शर्मा यांना घेऊन आले होते. त्यांनी भंवर लालकडे इशारा करुन शिवराळ भाषेचा वापर केला. तसेच त्याची कॉलर पकडली. शर्मा आणि पोलिसांना काही कळण्यापूर्वी सूर्यवंशी यांनी लाल यांच्या श्रीमुखात लगावली. नंतर दुबे आणि भंवर लाल यांनी हात जोडून माफी मागितली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तरीही सूर्यवंशी ऐकायला तयार नव्हते. दोघांमध्ये बाचाबाची झाली. शर्मा हे सूर्यवंशी यांना लांब ओढत नेले. मारहाणीची बातमी कळताच लोकांची गर्दी वाढू लागली. जवळ-जवळ अर्धा तास गोंधळ चालू होता. उपस्थित अधिका-यांनी प्रकरण कसेतरी शांत केले.
अधिका-याचे स्पष्टीकरण
नरेंद्र सूर्यवंशी पूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले, जिल्हाधिका-याच्या पाहुण्यांना मंदिरात घेऊन जात होतो. गेटवर तैनात पोलिस कर्मचा-यांनी ओळख सांगूनही ते ऐकायला तयार नव्हते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, उज्जैनच्या महाकाल मंदिरात झालेल्या पोलिस कर्मचारी-अधिका-या दरम्यान मारहाणीशी संबंधित photos...