आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रगीतातील ‘अधिनायक जय हे’ ब्रिटिशांचे कौतुक! कल्याण सिंहांचे वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राष्ट्रगीतातील ‘अधिनायक जय हे...’ मधील अधिनायक हा शब्द ब्रिटिश राजवटीचे कौतुक असल्याचे सांगून राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी वादाला तोंड फोडले .
‘जन गण मन अधिनायक जय हे....’ ‘अधिनायक’ कोणासाठी? हे ब्रिटिश राजवटीचे कौतुक आहे. त्यात दुरुस्ती झाली पाहिजे आणि त्याऐवजी ‘जन गण मन मंगल गाये...’ असे म्हणावे, असे त्यांनी राजस्थान विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात सांगितले. रवींद्रनाथ टागोरांबाबत मला आदर आहे, परंतु राष्ट्रगीतातील ‘अधिनायक’ हा शब्द वगळून त्याऐवजी ‘मंगल’ हा शब्द वापरला पाहिजे, असे ते म्हणाले.

डिसेंबर १९११ मध्ये टागोरांनी ही कविता लिहिल्यानंतरच तिच्यात ब्रिटिश राजवटीचे गुणगान आहे का, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु स्वत: टागोरांनीच १९३७ मध्ये पुलिन बेहरी सेन यांना लिहिलेल्या पत्रात हा आरोप फेटाळून लावला होता.