आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मध्ये तगडे सॅलरी पॅकेज घेत होती ही तरुणी; रायबरेलीतून 90 हजार मतांनी विजयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- युपीतील बाहुबली नेता अखिलेश सिंह राय यांची कन्या आदिती हिने राजकारणात शानदार पदार्पण केले आहे. अादितीने रायबरेली मतदार संघातून 90 हजार मतांनी विजय मिळवला आहे. अदिती हिला एकूण 1 लाख 28 हजार मते मिळाले. प्रतिस्पर्धी बसपचे उमदेवार मोहम्मद शाहबाज खान यांना एकूण 39 हजार मते मिळाली.

अमेरिकेतील लाखो रुपयांचे तगडे सॅलरी पॅकेज सोडून आदिती मायदेशात परतली आहे. इतकेच नाही तर समाजसेवेचे आवड असलेल्या आदिती हिने राजकारणात यशस्वी पदार्पण केले आहे.

आदितीला वडिलांच्या समर्थनाचा फायदा झाला आहे. अखिलेश सिंह राय हे बरेलीचे आमदार आहेत. 1993 पासून ते 5 वेळा MLA राहिले आहेत. आदितीचा उत्साह मतदारांना भावला. आदितीने मागील वर्षभरात कँपेनिंग केले. तिने घरारात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.

कर्जाच्या डोंगराखाली लढवली निवडणूक...
- अदिती हिने ड्यूक यूनिव्हर्सिटीतून मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली आहे.
- आदितीच्या डोक्यावर बँक बॅलेंसच्या 90 पटीने कर्ज आहे.
- निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अॅफिडेव्हिटमध्ये आदितीने एकूण 14 लाख रुपये मालमत्ता दाखवली आहे.
- सोबतच 45 लाख रुपयांचे कर्ज असल्याचेही तिने सांगितले आहे.
- ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी एका बँकेकडून तिने हे कर्ज घेतले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आदिती अखिलेश सिंह राय हिचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...