आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य खूनप्रकरणी माजी जदयू नेत्याचा मुलगा रॉकीसह तिघांना जन्मठेप एक लाखांचा दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया - बिहारमधील आदित्य सचदेव हत्येप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जनता दल (संयुक्त)च्या माजी आमदार मनोरमादेवी यांचा मुलगा रॉकीसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर रॉकीचे वडील बिंदी यादव यास ५ वर्षे कारावास भोगावा लागणार आहे.
 
न्यायालयाने रॉकी यास १ लाख रुपये दंड, तर इतरांना ५० हजार रुपये दंड ठोठावला. या सर्वांना ३१ ऑगस्ट रोजी दोषी ठरवले होते. रॉकीच्या कारला साइड दिली नव्हती म्हणून आदित्यची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही घटना ५ मे २०१६ रोजीची आहे.  

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सच्चिदानंद सिंह यांनी याप्रकरणी राकेश रंजन ऊर्फ रॉकी, मनोरमादेवीचा अंगरक्षक राजेशकुमार व रॉकीचा चुलतभाऊ राजीवकुमार टेनी यादव यांना दोषी ठरवले होते. त्याचबरोबर रॉकीचे वडील बिंदेश्वर प्रसाद यांनी आरोपींना आश्रय दिला आणि पोलिसांची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून दोषी ठरवले होते. 
 
कशी घडली घटना?  
७ मे २०१६ रोजी बोधगया ते गयाहून परत येत असताना रस्त्यावर आदित्य यास गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. आदित्यचे चार मित्र त्याच्यासोबत कारमध्ये होते. ही हत्या जदयूच्या आमदार मनोरमादेवी यांचा मुलगा रॉकी आणि मनोरमादेवींचा अंगरक्षक याने केली. या घटनेनंतर जदयूने मनोरमादेवींना पक्षातून निलंबित केले. साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार,  पुढे वाहतूक जाम असल्याने आदित्यने रॉकीच्या लँड रोव्हर वाहनास साइड दिली नव्हती.  यामुळे संतापलेल्या रॉकीने आदित्यच्या वाहनास ओव्हरटेक केले. दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आदित्यला मारहाण करण्यात आली. त्यानंतर रॉकीने आदित्यवर गोळ्या चालवल्याचा आरोप होता. एक गोळी आदित्यच्या डोक्यात लागलेली होती. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हे खून प्रकरण बिहार राज्यात खूप गाजले होते. 
 
आदित्यच्या मित्रांनी जबाब फिरवला  
आदित्यसोबत गाडीत असलेल्या चार मित्रांनी न्यायालयात साक्ष देताना आरोपींना ओळखण्यास नकार दिला. आदित्यची आई चंदा सचदेव यांना या घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार उलटल्याचे दु:ख आहे.  मित्रांची अडचण काय होती हे कायदा जाणतो. आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास वाटतो. मी तर माझा मुलगा गमावला. मग दुसऱ्याच्या मुलाला फाशी का व्हावी? असेही त्या म्हणाल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...