(फोटो: भाजपचे खासदार आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान)
गोरखपूर- भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशातील मंत्री आझम खान यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. आझम खान यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावर आदित्यनाथ यांनी आझम खान यांना खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. आदित्यनाथ यांनी आझम खान यांना काळा कावळा म्हणून संबोधले आहे.
'कुटुंब नसणार्यांना दुसर्यांचे दु:ख काय कळणार', अशा शब्दात आझम खान यांना
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नामोल्लेख न करता बिजनोर येथे टीका केली होती. यावर आदित्यनाथ यांनी आझम खान यांचा अर्वाच्य भाषेत समाचार घेतला आहे. आझम खान यांनी मुले जन्माला घालण्याची प्रेरणा प्राण्यांपासून घेतली असावी. आझम खान यांनी मुले जन्माला घालण्यासाठी पाकिस्तानात जावे, अशा शब्दात आदित्यनाथ यांनी आझम खान यांच्यावर शरसंधान साधले आहे.
दरम्यान, आझम खान यांनी मंगळवारी (4 नोव्हेंबर) पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केले होती. मोदी देशात नकारात्मक मानसिकतेचे राजकारण करत आहेत. मोदी यांनी ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. यावरून मोदींची आणि भाजपची नकारात्मक मानसिकता जगजाहीर झाली आहे. यावर योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत आझम खान यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. आदित्यनाथ म्हणाले, आझम खान असा कावळा आहे की, ज्या झाडावर बसेल ते झाड सुकवून टाकेल. एवढेच नव्हे तर प्राणी देखील पिलांना जन्माला घालतात. आझम खान यांनी प्राण्यांपासून मुले जन्माला घेण्याची प्रेरणा घेतली असावी, असेही आदित्यनाथ म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, 'जेथे मुस्लिम 10 टक्के पेक्षा जास्त तिथेच दंगली जास्त'