आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डावे बंदुकीच्या धाकावर सत्ता बळकावतात : आदित्यनाथ; केरळमध्ये काढली पदयात्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किचेरी (केरळ)  - भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केरळमध्ये पदयात्रा काढली होती. सत्ताधारी माकपने राजकीय हत्या घडवून आणल्याचा आरोप करतानाच राज्यात जिहादी वातावरण तयार केल्याचा घणाघातही आदित्यनाथ यांनी केला. बंदुकीच्या धाकाने सत्ता बळकावतात ही डाव्यांची रीत असल्याचेही त्यांनी सांगितले.  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी जनरक्षा नावाच्या पदयात्रेस प्रारंभ केला. या पदयात्रेत बुधवारी आदित्यनाथदेखील सहभागी झाले होते. देवभूमी असे बिरूद लावल्या जाणाऱ्या केरळमध्ये राजकीय वैमनस्यातून हिंसाचार घडवला जात आहे. हा हिंसाचार सत्ताधारी माकप प्रायोजित आहे. खरे तर डाव्यांनी नेहमीच बंदुकीच्या धाकानेच सत्ता मिळवण्याचे काम केलेले आहे, असे आदित्यनाथ म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही. दुर्दैवाने केरळमध्ये मात्र राजकीय पक्षाने प्रायोजित केलेला हिंसाचार पाहायला मिळू लागला आहे. आम्ही यात्रेच्या माध्यमातून सत्ताधारी सरकारच्या कारनाम्यांबाबत जनतेला जागृत करण्याचे काम करत आहोत. पंधरा दिवसांच्या यात्रेला जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचा दावाही आदित्यनाथ यांनी केला.  

शिकण्याच्या सल्ल्याबद्दल माकपला उत्तर 
गोरखपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर केरळमधील रुग्णालयांना भेट देऊन काम बघून उत्तर प्रदेशने काही तरी शिकले पाहिजे, असा सल्ला माकपने दिला होता. त्याचाही आदित्यनाथ यांनी समाचार घेतला.  उत्तर प्रदेश सरकारने डेंग्यू किंवा चिकुनगुन्यापासून जनतेचे संरक्षण केले आहे. केरळसारखे नाही. केरळमध्ये ३०० लोकांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला, असा टोला आदित्यनाथ यांनी लगावला. अलीकडेच गोरखपूरमधील एका रुग्णालयात प्राणवायूअभावी मोठ्या संख्येने मुले दगावली होती. 
बातम्या आणखी आहेत...