आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादंग सुरू असतानाच आदित्यनाथ ताजमहाल पाहण्यासाठी जाणार; 26 ऑक्टोबरला दौरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर- लखनऊ- ताजमहालावरून वाद सुरू झालेला असतानाच उत्तर प्रदेश सरकारने डॅमेज कंट्रोलची तयारी सुरू केल्याचे दिसून आले. ताजमहालास संस्कृतीवरील डाग असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे आमदार संगीत सोम यांना माफी मागण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर आदित्यनाथ २६ ऑक्टोबर रोजी ताजमहाल पाहण्यासाठीदेखील जाणार आहेेत.  

ताजमहाल कोणी व का बनवले होते, याला काहीही महत्त्व नाही. तो भारतीय श्रमिकांनी घाम गाळून तयार केला होता. हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, असे आदित्यनाथ म्हणाले. चार दिवसांच्या गोरखपूर दौऱ्यावर आलेल्या आदित्यनाथ यांनी हे स्मारक सरकारसाठी महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले. पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे विशेष महत्त्व आहे. पर्यटकांना येथे सुविधा व सुरक्षा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रिव्हर फ्रंटदेखील विकसित करण्यात येणार आहे. 

गुलामीचे स्मरण करून देणारे  राष्ट्रपती भवनही तोडले पाहिजे  
समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. गुलामीचे स्मरण करून देणाऱ्या सर्व इमारती पाडण्यात यायला हव्यात. उदाहरणार्थ-राष्ट्रपती भवन किंवा ताजमहाल. संसद भवन, कुतूब मिनार, लाल किल्ला, ताज महाल आणि अशा आणखी इमारती पाडण्यात याव्या, असे मी पूर्वीही एकदा म्हणालो होतो, असे आझम खानने म्हटले आहे.  

शिया बोर्ड म्हणाले, अयोध्येतील श्रीराम मूर्तीसाठी देऊ चांदीचे १० बाण 
उत्तर प्रदेश शिया मध्य वक्फ मंडळाने अयोध्येतील शरयू किनाऱ्यावरील प्रस्तावित भगवान श्रीरामांच्या विशाल प्रतिमेसाठी चांदीचे १० बाण भेट दिले जातील, असे जाहीर केले आहे. मंडळाचे अध्यक्ष वसीम रिझवी म्हणाले, अवधची गंगा-यमुना संस्कृती लक्षात घेऊन भगवान रामांविषयी शियांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत.  

काँग्रेस, सपा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार
उत्तर प्रदेशातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस, सपा परस्परांच्या विरोधात लढणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. गुलाम नबी आझाद यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस स्वबळावर ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या वक्तव्यावर समाजवादी पार्टीचे प्रवक्ते सुनील सिंह सजन म्हणाले, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहोत. वास्तविक काँग्रेस व सपा यांनी २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक लढवली होती.
बातम्या आणखी आहेत...