आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला पाहण्यासाठी ती आली स्वीडनहून भारतात, तब्बल 27 वर्ष घेतला शोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीलाक्षी एलिजाबेथ जोरेंडल आपल्या आईच्या शोधात 1990 पासून भारतात येत होती. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
नीलाक्षी एलिजाबेथ जोरेंडल आपल्या आईच्या शोधात 1990 पासून भारतात येत होती. (संग्रहित फोटो)
मुंबई- भारतात जम्म घेतलेल्या नीलाक्षी एलिजाबेथ जोरेंडलसाठी तो क्षण खूपच भावूक होता जेव्हा ती 41 वर्षांनंतर तिच्या आईला भेटली. नीलाक्षी 44 वर्षांची असून ती 3 वर्षांची असताना तिला स्वीडनमधील एका दाम्पत्याने दत्तक घेतले होते. तिला आपल्या आईला शोधण्यासाठी पुण्यातील "अजेंस्ट चाइल्ड ट्रॅफिक" या संघटनेच्या अंजली पवार यांनी मदत केली. 

आई आणि मुलीच्या भेटीचा अत्यंत भावूक क्षण

- अंजली पवार यांनी सांगितले की, यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात शनिवारी माय लेकीची भेट घडली. त्यावेळी दोघींही अत्यंत भावूक झाल्या होत्या. 
- जोंडरिलचे वडील शेतात मजुरी करत त्यांनी 1973 मध्ये आत्महत्या केली. 
- 1973 मध्येच तिचा जन्म पुण्याजवळील केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या अनाथाश्रमात झाला.

आईने केले दुसरे लग्न

- नीलाक्षींच्या आईने पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या तिला सोडले आणि त्यानंतर दुसरे लग्न केले. 
- नीलाक्षींच्या आईला दुसऱ्या पतीपासून एक मुलगा आणि मुलगी आहे. शनिवारी ते देखील उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...