आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पहिले डान्सरला केले ओले, असा सुरु होता कल्चरल प्रोग्राममध्ये डान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुंदी (राजस्थान) - येथील एका कल्चरल प्रोग्राममध्ये हिंदी चित्रपट गीतांवर आधारीत डान्स शो ठेवण्यात आला होता. डीजेवर फिल्मी गाणे वाजवले जात होते, त्याच्या तालावर बारगर्ल्स ठुमके लगावत होत्या. सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या या कार्यक्रमात डान्सर एवढे बेभान झाले की महिला आणि मुली उठून गेल्या अखेर कार्यक्रमच बंद करावा लागला.
पोलिसांच्या उपस्थितीत सुरु होता अश्लिल डान्स
या कार्यक्रमात पोलिसच नाही तर वरिष्ठ पोलिस अधिकारीही उपस्थित होते. डान्सरचे स्टेजवरील चाळे पाहून हा कार्यक्रम बंद करण्याऐवजी तेही 'मजा' घेताना दिसले. सार्वजिनिक ठिकाणी सुरु असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांमध्ये महिला आणि मुलींची संख्याही मोठी होती. मात्र स्टेजवर सुरु असलेला डान्सपाहून त्यांना शरमेने माना खाली घालाव्या लागल्या. काही जणी ते अश्लिल चाळे पाहवले न गेल्यामुळे उठून गेल्या. जेव्हा डान्सरने स्टेजवर सर्व हद्द पार केली, तेव्हा हा कार्यक्रमच बंद करण्यात आला.

अशा डान्स स्टेप्स की तिथे बसलेल्या महिलांना माना खाली घातल्या
- राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील देई या गावात बाबा बख्तावर यांचा मेळा लागला होता.
- या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी कल्चरल नाइटचे आयोजन करण्यात आले होते.
- डान्सर आणि कलाकारांनी सुरुवातील वाहवा मिळवली मात्र जेव्हा 'टीप-टीप बरसा पानी' हे गाणे सुरु झाले तेव्हा महिला आणि मुलींना माना खाली घालाव्या लागल्या.
- डान्सरच्या डान्स स्टेप्स आहेत की स्टेजवर अश्लिल चाळे सुरु आहेत असा प्रश्न पडावे एवढे भडक नृत्य सुरु होते.
- सामाजिक कार्यक्रमात अशा प्रकारचा डान्स पाहून लोक भडकले. काही महिला आणि पुरुषांनीही कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
- या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षिक महेंद्र मेघवंशी उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांचाही मोठा ताफा हजर होता.
- कार्यक्रमाला गावच्या सरपंच गीता सोनीही उपस्थित होत्या.
- सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने स्टेजवर अश्लिल चाळे झाल्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

पुढील स्लाइडमध्ये पाहा कल्चरल प्रोग्रामचा व्हिडिओ... आणि फोटो..
बातम्या आणखी आहेत...