आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडवाणी हेच बाबरीचे गुन्हेगार : आझम खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी हेच बाबरी प्रकरणाचे गुन्हेगार आहेत, असा घणाघाती आरोप सपाचे नेते आझम खान यांनी मंगळवारी केला. मुलायम सिंह यांनी अडवाणी यांची स्तुती केल्यानंतर समाजवादी पार्टीत जोरदार घमासान सुरू झाली आहे.अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या यात्रेनंतरच वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली होती, याचा मुलायम यांना विसर पडला आहे. त्यानंतर दंगलीत अनेक अल्पसंख्यांक लोकांचा मृत्यू झाला होता, असे आझम खानने म्हटले आहे. मुलायम यांनी 23 मार्च रोजी लोहिया यांच्या 103 व्या जयंती निमित्त अडवाणी यांची स्तुती केली होती. अखिलेश सरकारच्या अपयशापासून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी अडवाणी यांची स्तुती करण्यात आली आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कलराज मिश्र यांनी केली आहे.