आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षांपासून अडवाणी गुजरातमधील खासदार, BJP चे स्टार प्रचारक तरीही प्रचारापासून आहेत दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - भारतीय जनता पार्टी (बीजेपी) चे संस्थापक सदस्य असलेले माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी गुजरात निवडणुकांपासून दूरच असल्याचे दिसते आहे. राजकीय कारकिर्दीत गुजरात निवडणुकीपासून दूर राहण्याची अडवाणींची ही पहिलीच वेळ आहे. अडवाणी 19 वर्षांपासून गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत, त्यामुळेही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अडवाणींनी 1990 मध्ये जी रथ यात्रा काढली होती, त्या यात्रेची सुरुवातही त्यांनी सोमनाथमधूनच केली होती. त्यामुळे आता त्यांचा निवडणुकीपासूनचा दुरावा चर्चेचा विषय ठरत आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होत असून निकाल 18 डिसेंबरला हाती येतील. 


स्टार प्रचारकांच्या यादीत अडवाणींचे नाव 
- भाजपने निवडणूक आयोगाला पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी जी स्टार प्रचारकांची यादी दिली आहगे, त्यात अडवाणींचेही नाव आहे. पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अडवाणींचे नाव आहे. त्यामुळे यादीत नाव असल्याने आता प्रत्येकाला अडवाणी प्रचारासाठी कधी येणार याची उत्सुकता लागलेली आहे. 


यादीत अडवाणींचे नाव का?
- दिल्ली भाजपच्या सुत्रांच्या मते, अडवाणी निवडणूक प्रचारात सहभागी होणार नाहीत. इलेक्शन कोअर कमिटीने स्टार प्रचारकांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्याबाबत त्यांचे मतही विचारात घेतले नव्हते. अडवाणींना मुद्दाम प्रचारापासून दूर ठेवले असे कोणीही म्हणू नये म्हणून त्यांचे नाव यात समाविष्ट करण्यात आले असे म्हटले जात आहे.  
- प्रचारकांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करून मोदी-शहा यांनी चेंडू अडवाणींच्या कोर्टात ढकलला आहे. तर मार्गदर्शक मंडळाचे दुसरे नेते मुरली मनोहर जोशी यांचे तर यादीत नावही नाही. 


राजनाथही दूर असल्याची चर्चा
- गुजरात निवडणुकीत ज्या नेत्याच्या अनुपस्थितीची सर्वाधिक चर्चा होत आहे, ते नेते म्हणजे गृहमंत्री राजनाथ सिंह. त्यांनी 2013 मध्ये अडवाणींची इच्छा नसतानाही गोव्यात राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नरेन्द्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले होते. 
- मंत्रिमंडळातील इतर सहकारी प्रचारात उतरलेले असताना राजनाथ सिंह मात्र प्रचारात दिसत नाहीत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये ते येण्याची शक्यताही आहे, पण अद्याप त्यांचा अधिकृत दौरा जाहीर झालेला नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...