आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदला घेण्यासाठी वकिलावर तरुणाने फेकले तेजाब, आरोपीस अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅड. महेंद्रकुमार सिंवर - Divya Marathi
अॅड. महेंद्रकुमार सिंवर
सरदार शहर - सामूहिक बलात्कार प्रकरणात वडिलांना तुरुंगवासाची शिक्षा झाल्याने त्याच्या मुलाने एका वकिलाच्या घरात घुसून त्याच्यावर तेजाब फेकले. जळालेल्या अवस्थेत वकिलास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून उपचारासाठी जयपूरला पाठवण्यात आले आहे.

या घटनेत आरोपी मुलगाही भाजला गेला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तक्रार अर्ज लिहून घेण्याचा बहाणा करून हा आरोपी मुलगा वकिलाच्या घरात घुसला होता. ही घटना राजस्थानातील एका गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अॅड. महेंद्रकुमार सिंवर त्यांच्या कार्यालयात काम करत होते. यादरम्यान राकेश बेरड नावाचा तरुण त्यांच्याकडे आला. त्याच्या हातात स्टीलची कॅन होती. ती त्याने टेबलावर ठेवली आणि स्वत: स्टूलावर बसला. त्याने वकिलास सांगितले, मी रात्री दूध वाटपास गेलो असता मला पोलिसात तक्रार द्यायची आहे, असे सांगितले. वकिलांनी संमती दर्शवताच, त्या तरुणाने स्टीलच्या कॅनमधील अॅसिड त्यांच्या अंगावर फेकले. वकिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून राकेशला अटक करण्यात आली. वकिलांनी सांगितले, त्याच्या वडिलास सामूहिक बलात्कार प्रकरणात शिक्षा झाली आहे. या प्रकरणात पीडितेची बाजू महेंद्रकुमार यांनी न्यायालयात मांडली होती.
बातम्या आणखी आहेत...