आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • African Dancing In Bhangada Competition At Boston

गोऱ्यांसोबत आफ्रिकनांवरही बल्ले-बल्लेचा ज्वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत बोस्टन प्रांतात  भांगडा स्पर्धा सुरू आहे. त्यात ५० विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी स्वतंत्र भांगडा टीम बनवून सहभाग घेतला आहे. - Divya Marathi
अमेरिकेत बोस्टन प्रांतात भांगडा स्पर्धा सुरू आहे. त्यात ५० विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी स्वतंत्र भांगडा टीम बनवून सहभाग घेतला आहे.
चंदिगड- अमेरिकेत बोस्टनमध्ये भांगडा कॉम्पिटिशन सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे त्यात सहभागी झालेल्या संघांमध्ये पंजाबी वंशाच्या लोकांची संख्या एक - दोन इतकी नगण्य आहे. अमेरिकेतील ५० विद्यापीठांतील संघांनी त्यांच्या स्वतंत्र भांगडा टीम बनवून या स्पर्धेत भाग घेतला आहे.
त्यात गोऱ्यांसोबतच आफ्रिकी वंशाच्या तरुणांची संख्या जास्त आहे. त्यांनी भांगडा फ्यूजन रूपात सादर करून तो अधिक लोकप्रिय केला आहे. त्यात ढोलच्या बरोबरीने वेस्टर्न बीट्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे विदेशींमध्ये त्याची क्रेझ वाढली आहे. इतकेच नव्हे तर विदेशात होणाऱ्या टीव्ही शोजमध्येही बल्ले - बल्लेची धूम सुरू आहे. गेल्या वर्षी ‘अमेरिका गॉट टॅलेंट'मध्ये कॉर्नेल विद्यापीठाच्या भांगडा टीमने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.

पीएम ट्रुडोच्या भांगड्यास १० लाख हिट्स : १० ऑक्टोबर रोजी निवडणुका जिंकल्यानंतर कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भांगडा नृत्य केले होते. त्यांचे छायाचित्र फेसबुकवर व्हायरल झाले.त्याला १० दिवसांत ८ लाख हिट्स मिळाल्या. आतापर्यंत १० लाख लोकांनी हे छायाचित्र पाहिले आहे. ट्रुडोंना पंजाबींविषयी विशेष आत्मीयता आहे. त्यांच्या सरकारमध्ये चार शीख मंत्री आहेत.

७०० कोटी व्यवसाय
जगभरात भांगडा लोकप्रिय आहे. भांगडा शिकण्याचे क्लासेस न्यूयॉर्कपासून लंडनपर्यंत आहेत. एका रिपोर्टनुसार भांगडाचा ग्लोबल व्यापार ५०० ते ७०० कोटींचा आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कार्यक्रमातील एक खास फोटो...