आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After 100 Years First Time Dalit Bride Varat In Rajsthan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शंभर वर्षांत पहिल्यांदाच राजस्थानात दलित नवरदेवाची वरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथरेडी (कोटपुतली) - जयपूरपासून १२५ किलोमीटर अंतरावरील काेटपुतली तालुक्यातील पाथरेडी गावात नुकतीच दलित समुदायातील एका नवरदेवाची घोडीवरून वरात निघाली होती. गेल्या शंभर वर्षांत हे पहिल्यांदाच घडले. एवढ्या वर्षांची विशिष्ट समाजाकडून होणारी मुस्कटदाबी गेल्या गुरुवारी बंद झाली आणि नव्या परंपरेला सुरुवात झाली.

गुरुवारी जुनी परंपरा संपुष्टात आली. सायंकाळी नवरेदव अनिल घोडीवर बसला होता; परंतु घोडीचा लगाम मात्र पोलिसांच्या हाती होता. वरिष्ठ अधिकारी राजपूत समाजासमोर हात जोडून त्यांना शांत राहण्याची विनंती करत होते. राजपूत समाजाकडून पोलिसांना अाडकाठी करणार नसल्याचे वचन मिळाल्यानंतरच बंदोबस्तात वरात काढण्यात आली.

पोलिसांनी ठरवून िदलेल्याच मार्गाने ही वरात काढण्यात आली होती. त्या दरम्यान गावाच्या प्रत्येक गल्ली, चाैकात पोलिसांचा खडा पहारा होता.

जयपूरहून १२५ किलोमीटर दूर कोटपुतली तालुक्यातील पाथरेडीमध्ये सुमारे १०० वर्षांत पहिल्यांदाच दलित व्यक्तीची घोडीवर निघालेली वरात.

दुस-यागावातून बोलावली घोडी
गावात दलित कुटुंबांकडे चार घोड्या आहेत. त्या सवर्णांच्या विवाह समारंभात वापरण्यात येतात; परंतु दांडगाईकरणा-यालोकांच्या भीतीने अनिल यास गावातील घोडीवर बसू देण्यात आले नाही. गावात घोडीवर सवर्ण बसतात. त्यावर अनिल बसल्यास त्यांचा विरोध पत्करावा लागेल, ही शक्यता होती. त्यातून हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ३० किलोमीटर दूर असलेल्या गावातून घोडी मागवण्यात आली होती.