आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तब्‍बल 24 वर्षांनंतर खुले झाले ‘छोटा अमरनाथ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांदीपोर- जम्मू-काश्मिरातील पर्यटनवृध्दीसाठी विविध उपक्रम हातात घेण्यात येत आहेत. बांदीपोर जिल्ह्यातील दाट जंगलात सुमारे 5800 फूट उंचीवर असलेल्या डोंगरावरील महा धनेश्वर मंदीराची कवाडे गुरुवारी भाविकांसाठी खुली करण्यात आली. 24 वर्षांपासून हे मंदीर बंद होते. ‘छोटा अमरनाथ ’नावाने हे मंदीर ओळखले जाते.

महादेवास अभिषेक : घनदाट जंगलातील डोंगरावरील छोट्याशा गुहेत स्वयंभू शिवलिंग आहे.या मंदीरात दर श्रावणी पोर्णिमेला अर्थात राखी पोर्णिमेच्या दिवशी एक दिवसाची जत्रा भरते.या मंदीरात गुरुवारी 24 वर्षानंतर प्रथमच महादेवाच्या पिंडीला विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली.