आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Amma Mineral Water, Salt Now Amma Medicine Store

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तामिळनाडूत अम्मा मिनरल वॉटर, सॉल्टनंतर आता \'अम्मा मेडिकल स्टोअर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- 'अम्मा कँटिन', 'अम्मा मिनरल वॉटर', 'अम्मा मीठ' या उत्पादनांची निर्मिती केल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या नावाने आता राज्यात 'अम्मा मेडिकल स्टोअर' सुरू केली आहेत. जयललिता यांनी चेन्नई, एरोड, सालेब, कुडलोर, मदुराई, सिवगंगा आणि विरूधुनगर या शहरांमध्ये 10 मेडिसिन स्टोअर्स सुरु केली आहेत. एकूण 100 मेडिकल स्टोअर्स सुरु केले जाणार आहे. चेन्नईत 20 मेडिकल स्टोअर्स सुरु केली जाणार आहे. सर्वसामान्यांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची निर्मिती केल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्री जयललिता यांना तामिळनाडूत अम्मा या नावाने ओळखले जाते. त्यामुळे याच नावाच्या योजना राज्य सरकारकडून तयार करण्यात येत आहेत.
राज्याचे मंत्री सेल्लूर राजू यांनी सांगितले, की राज्यातील सर्व स्तरातील जनतेला जीवनरक्षक औषधी स्वस्त दरात मिळाव्या, अशी जयललिता यांची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर ही मेडिकल स्टोअर्स सुरु करण्‍यात आले आहेत. राज्य सरकारने या योजनेसाठी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

(फाइल फोटो-अम्मा ब्रांड मिनरल वॉटर वितरित करताना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता)