आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी 5 जणांनी केला गॅँगरेप, नंतर राजरोस दिली \'ती\' धमकी, पीडितेने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 जणांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता. - Divya Marathi
5 जणांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता.
बागपत - येथे 13 ऑक्टोबर रोजी एका गँगरेप पीडित मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली. मुलगी 9वीची विद्यार्थिनी होती. 4 महिन्यांपूर्वीच तिच्यावर 5 जणांनी गँगरेप केला होता. परंतु, गुन्हेगारांविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्याने ते राजरोस उजळ माथ्याने फिरत होते. नराधम तिला पुन्हा गँगरेप करण्याची धमकी देत होते. यामुळे त्रस्त होऊन मुलीने टोकाचे पाऊल उचलले. तिच्या मृत्यूनंतर रविवारी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.
 
गँगरेपच्या 4 महिन्यांनी पीडितेला नराधमांनी दिली ही धमकी
- हे प्रकरण बागपत जिल्ह्यातील रमाला परिसरातील आहे. येथे राहणारी 9वीची विद्यार्थिनी श्वेता (बदललेले नाव) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
- आईने सांगितले की, या परिसरातील 5 गुंड मुलीला नेहमी त्रास देत होते. शाळेत जाता-येता तिची छेड काढत होते. यामुळे मुलीने शाळेत जाणेही बंद केले होते. 4 महिन्यांपूर्वी 28 जून रोजी पाचही गुंडांनी मुलीला किडनॅप करून तिच्यावर गँगरेपही केला होता. मुलगी जखमी अवस्थेत गावाबाहेर पडली होती.
- 8 जुलैला रमाला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला, मेडिकलही झाले. न्याय प्रक्रियेअंतर्गत 164चे जबाबही झाले, परंतु केस विना निर्णयाची बंद करण्यात आली.
- यामुळे गुंडांचे आणखीनच फावले. मुलीला ते अजून जास्त त्रास देऊ लागले. तिने मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली, पण काहीच कारवाई झाली नाही. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दरबारातही गेले, पण तिथेही आश्वासनावर बोळवण झाली.
- शुक्रवारी मुलगी घराजवळच्या दुकानावर सामान आणायला गेली होती. तेथे या पाचही गुंडांनी तिची छेड काढली आणि पुन्हा एकदा पूर्ण गावासमोर गँगरेप करण्याची धमकी दिली.
- त्यांचे बोलणे ऐकून मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला. संध्याकाळी घरात कोणी नसताना तिने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
- तत्पूर्वी, पीडितेने 8 जुलैला गुन्हा दाखल केल्यानंतर मीडियासमोर सांगितले होते की, पाचही आरोपींनी तिला कारमधून किडनॅप केले आणि इकडे-तिकडे फिरवत राहिले. यानंतर जंगलात नेऊन तिच्यावर गँगरेप केला.
 
5 ही आरोपींना अटक, एसपींनी सुरू केला तपास
- एसपी जयप्रकाश म्हणाले, याप्रकरणी आरोपींविरुद्ध पुन्हा एकदा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोबतच क्राइम ब्रँच प्रभारी, तत्कालीन इन्स्पेक्टर रमाला आणि या प्रकरणाचे आयओ राहिलेले शरद तिलारा यांना निलंबित करण्यात आले अहो.
- जुलै महिन्यात दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्याची मेडिकल रिपोर्ट आणि फायनल रिपोर्ट का लावण्यात आली, याचीही माहिती घेतली जात आहे. तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
- तथापि, शनिवारी एडीजी आनंद कुमार यांनी लखनऊमध्ये मीडियाशी बोलताना सांगितले की, गँगरेपच्या आरोपींना कडक शिक्षा कशी होईल हे पाहू, त्यांना सोडणार नाही.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित प्रकरणाचे आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...