आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर खोऱ्यात चौथ्या दिवशीही हिंसाचार सुरूच, मृतांची संख्या झाली 33

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमध्ये सलग चौथ्या दिवशीही हिंसाचार सुरूच होता. दक्षिण, उत्तर आणि मध्य काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने झाली. पुलवामात पोलिस चौकीला आग लावण्यात आली. सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिस पथकावर हल्ला केला. संचारबंदी सुरूच आहे. जम्मू येथून सायंकाळी अमरनाथ यात्रेकरूंचा दुसरा जत्था कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना करण्यात आला. पोलिस गोळीबारात एक निदर्शक ठार झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, शोपियां, कुलगाम, पुलवामा, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, सोपोर, कुपवाडा, गंदरबल, बांदीपोरा आणि मध्य काश्मीरमधील श्रीनगर आणि बडगाम या दोन जिल्ह्यांत निदर्शकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. रोमू पुलवामा चौकीला आग लावण्यात आली. वरपोरा सोपोरमध्ये गस्त घालणाऱ्या पथकावर हल्ला झाला. गर्दीचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार केला. त्यानंतर ते फरार झाले. काश्मीरमध्ये आता खाण्या-पिण्याच्या वस्तूंची टंचाई जाणवत आहे. निदर्शकांनी रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान केले आहे. हे रेल्वेमार्ग दुरुस्त करण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पंतप्रधान मोदींचे शांततेचे आवाहन
नवी दिल्ली - चार आफ्रिकी देशांचा दौरा करून मंगळवारी परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला. काश्मीरला शक्य ती सर्व मदत केली जाईल, लोकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. बुरहान वाणी दहशतवादी होता. त्याला मोठा नेता बनवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, काश्मीरमधील बिघडलेली स्थिती पाहता गृहमंत्री राजनाथसिंह यांनी अमेरिकेचा दौरा रद्द केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, स्वतःच जाळ्यात अडकला होता बुऱ्हान....
बातम्या आणखी आहेत...