आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Cheap Idle Dosh Now In Tamil Nadu Amma Mineral Water

स्वस्त इडली-डोशानंतर तामिळनाडूत आता ‘अम्मा मिनरल वॉटर’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - स्वस्त इडली-डोसा व चपाती-दालच्या जेवणानंतर तामिळनाडूतील गरीब आणि मध्यमवर्गीयांना तामिळनाडू सरकारतर्फे शुद्ध पाण्याची बाटलीही पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी ‘अम्मा मिनरल वॉटर’ उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात येणार असून दहा रुपयांत एक लिटर पाणी दिले जाणार आहे.


तामिळनाडूतील जनतेला शुद्ध पाण्याची हमी देताना अल्पदरात ते उपलब्ध करून देण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. राज्यात नऊ प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. हे प्रकल्प परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात येणार आहेत. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जयललिता यांना अम्मा नावाने संबोधतात. त्याच नावाने पहिला प्रकल्प गुम्मीडीपुंडी भागात सुरू करण्यात येणार आहे.