आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे \'लक्ष्य उत्तर प्रदेश\' कार्यकारिणी बैठकीत मंथन;शहांची सपा व काँग्रेसवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद- उत्तर प्रदेशात होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलाहाबादेत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी "लक्ष्य उत्तर प्रदेश'वर भर दिला. उत्तर प्रदेशात मथुरासह अशात झालेल्या भयंकर दंगलींचा उल्लेख करून त्यांनी सत्ताधारी समाजवादी पक्षावर जोरदार आसूड ओढले.

दरम्यान, २०१७ मध्ये उत्तर प्रदेशासह पंजाब, गुजरात, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय सत्ताकाळात मिळवलेले यश लोकांपर्यंत पोहाेचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, हे करत असताना पक्षासमोर असलेली आव्हानेही अमित शहा यांनी मांडली. उत्तर प्रदेशात भाजप सत्ता मिळवेल, असा विश्वास व्यक्त करून २०१९ मध्ये केंद्रातही पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, असा दावा शहा यांनी केला.

या कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते अलाहाबादेत एकवटले आहेत. शहा यांनी केलेल्या भाषणातील मुद्यांची माहिती रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना दिली. उत्तर प्रदेशचा विकास हेच भाजपचे ध्येय असल्याचे सांगून पक्ष यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रसाद यांनी नमूद केले.

मुख्यमंत्रिपदाबाबत मौन
उत्तर प्रदेशात अागामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून उतरेल, असे मानले जाते. मात्र, कार्यकारिणीत याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. हा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल, असे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात अागामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून उतरेल, असे मानले जाते. मात्र, कार्यकारिणीत याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. हा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल, असे त्यांनी सांगितले.
>काँग्रेसचा प्रभाव आणि शक्ती वरचेवर कमी होत चालली आहे. केंद्राच्या विकासकार्यात अडथळे आणल्यामुळे हळूहळू या पक्षाचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे.
>सौदी अरब आणि अफगाणिस्तान या इस्लामी राष्ट्रांनी आपला सर्वोच्च सन्मान मोदींना प्रदान केल्याचा उल्लेख करून शहा यांनी पक्षाच्या आंतरराष्ट्रीय यशाचाही पाढा वाचला.
>२१ व्या शतकात नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली आता भारत जागतिक पातळीवर इतर देशांसाठी एक दीपस्तंभ ठरत असल्याचा दावा शहा यांनी केला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...