आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरमाळा घातल्यानंतर दुसऱ्यासोबत घेतले सात फेरे, मंडपाबाहेर बसला होता आधीचा नवरदेव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर- येथील एका लग्नाच्या कार्याक्रमात 18 तास ड्रामा चालू होता. नवरदेवाची वरात नवरीच्या दारात पोहोचली, वरमाळा टाकण्याचा विधी देखील पार पडला. परंतु, सात फेरे गेण्यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये एवढा वाद सुरू झाला की त्यानंतर नवरीच्या पक्षवल्यांनी लग्नास नकार दिला. आपले भविष्य खराब होत असल्याच्या चिंतेने नवरीला रडू कोसळले, हे पाहून तिच्या घराच्यांनी एका दुसऱ्या नवरदेवाला शोधून आणले आणि त्याला रोडीमेड शूज आणि कपडे देऊन लग्नही लावून दिले.


यापूर्वी वरमाळा देखील टाकण्यात आल्या होत्या...
- ग्वाल्हेर येथील निंबाजीची खोह येथील राहणारे कल्याण सिंह परिहार यांनी मुलगी पिंकीचे लग्न किशन परिहारशी एका वर्षापूर्वी ठरवले होते.
- 30 नोव्हेंबरला लग्नाचा विधी व्यवस्थित पार पडत होता. सोमवारी रात्री किसनची वरात पिंकीच्या दारी पोहोचली. पिंकीच्या कुटुंबीयांनी वऱ्हाडी मंडळीचे स्वागत केले. त्यानंतर वरमाळा देखील टाकून झाल्या.
- रात्री 1 वाजता सात फेऱ्यांचा मुहूर्त होता. परतु, दोन्ही पक्षात स्टेजवरच वाद सुरू झाला. नवरीचे मामा नवरीला स्टेजवरून घेऊन जात होते, तेवढ्यात नवरदेवाच्या भावाने तिला थांबवून स्टेजवरच आशिर्वाद देताना फोटो काढायचा असल्याचे सांगितले. फेऱ्यांची वेळ झाली असल्याचे मामाने त्यला सांगितले आणि यावरूनच वादाला सुरूवात झाली.
- मामाने सांगितले की, नवरदेवाचा भाऊ मनोज याने माला मारहाण केली आणि त्याच्या साडूने गोळी झाडून बंदूक माझ्या छातीवर धरली. येथून ते नवरीला घरी घेऊन गेले आणि लग्नास नकार दिला.
- नवरीच्या नातेवाईकांनी सागितले की, नवरदेव लगडा होता, एका तर पडला देखील होता. असे वाटत होते की तो विकलांग होता. ही गोष्ट आमच्यापासून लपवण्यात आली होती. यावरून वरपक्षाने गोंधळ सुरू केला. पोलिस आले तेव्हा दोन्ही पक्षांनी लिहून दिले की, त्यांना लग्न करायचे नाही.


आधीचा नवरदेव बाहेरील एका घरात बसून रहीला...
नवरी बेशुद्ध झाली तेव्हा मामाच्या मुलीच्या सासरवाडीतील एक युवक लग्नासाठी तयार झाला. त्याच्यासाठी नवीन कपडे आणि शुज खरेदी करण्यात आले. या दरम्यान आधीचा नवरदेव किसन बाहेरील एका खोलीत बसलेला होता.

बातम्या आणखी आहेत...