आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Gehlot, Rajasthan's Home Minister Kataria Tests Positive For Swine Flue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारियांना स्वाइन फ्लूची बाधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना स्वाइन फ्लू झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कटारिया व त्यांची पत्नी अनिता यांना सर्दी व ताप आल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. उदयपूरमधील एमबी चिकित्सालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गृहमंत्री कटारिया यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले असले तरी अनिता यांना मात्र ही बाधा झाली नसल्याचे डॉ. महेश दवे म्हणाले. राजस्थानमध्ये या रोगाचा प्रसार वाढत चालला असून राज्यात आतापर्यंत ५८ जणांचा मृत्यू झाला आहे.