आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानची पाकला धमकी, वाघा सीमेवरून जाऊ द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - वाघा सीमेवरून भारतात जाऊ द्या, अन्यथा पाकिस्तानी व्यापाऱ्यांसाठी अफगाणिस्तानचा रस्ता बंद करू, अशी धमकी अफगाणिस्तानने पाकिस्तानला दिली आहे. पाकिस्तानचे व्यापारी अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियात जातात.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या वेबसाइटवर पश्तु भाषेत ही धमकी दिली आहे. त्यात म्हटले की, पाकिस्तानने अफगाणिस्तानातील ताज्या फळांच्या निर्यातीसाठी शेकडो वर्षांपासून सुरू असलेला मार्ग बंद केला आहे. यामुळे आमच्या व्यापाऱ्यांचे लाखो डॉलरचे नुकसान होत आहे. त्यांनी सांगितले की, आता अफगाणिस्तानला कुलूपबंद करून ठेवू शकत नाही. आमच्याकडे आणखी मार्ग असून त्याचा वापर व्यापारासाठी करू. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत, अशा स्थितीत गनी यांचे हे वक्तव्य आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...