आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 'goonda' Remark, Mayawati Dubs SP Men As 'terror' Elements

'सपा कार्यकर्ते गुंड नव्हे, बेलगाम दहशतवादी!'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- बसपाच्या सर्वेसर्वा मायावती समाजवादी पार्टीवर पुन्हा एकदा तुटून पडल्या आहेत. सपा कार्यकर्त्यांना गुंड नव्हे तर बेलगाम दहशतवादी म्हणणार आहे. राज्यपालांनीही घटनात्मक जबाबदारी सांभाळावी, असा सल्ला त्यांनी दिला. मायावती म्हणाल्या, सपा कार्यकर्त्यांना मी खुशीत नव्हे तर दु:खी होऊन गुंड संबोधले. मात्र, आता त्यांना मी बेलगाम दहशतवादी म्हणणार आहे. राज्यपालांनीही आपली घटनात्मक जबाबदारी सांभाळणे आवश्यक आहे. त्यांनी केंद्राला राज्याचा योग्य अहवाल पाठवून राष्‍ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. मात्र, ते जनतेचे शोषण व छळ पाहत आहेत. त्यासाठी त्यांना जनता कधीही माफ करणार नाही.

याआधी राज्यात बसपाचे पुन्हा सरकार आल्यास सपाच्या सर्व गुंडांना धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान, मायावती यांना घटनेचे व भाषेचेही ज्ञान नाही, असा आरोप सपाचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी केला आहे.