आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Handwara Firing Mobile Internet Services Suspended In Kashmir

#Handwara मध्‍ये तिस-या दिवशीही तणाव, काश्‍मीरमध्‍ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- हंडवारा येथे सुरक्षा जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका क्रिकेटपटूसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर श्रीनगरमध्ये तणाव पसरला आहे. बंदही पुकारण्यात आला आहे. गुरूवारीही तणावाची परिस्‍थिती कायम असून, राज्य शासनाने मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली आहे. समाजात तेढ निर्माण करणा-या अफवा पसरू नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. अशी आहे परिस्‍थिती....
- तणावाच्‍या परिस्‍थितीमुळे हंदवाडामध्‍ये संचारबंदी लागू आहे.
- फुटीरतावादी नेत्‍यांनी पुन्‍हा एकदा घाटीमध्‍ये बंदची घोषणा केली.
- दोन दिवसांपासून जिल्‍ह्यातील काही भागात संचारबंदी आहे.
या भागांमध्‍ये अधिक तणाव..
- श्रीनगरशिवाय कुपवाडा, गांदरबल, हंदवाडा, पुलवामा यासह कित्‍येक जिल्‍ह्यामध्‍ये तणावाची परिस्‍थिती वाढत आहे.
- बुधवारी आंदोलकांनी कुपवाडामध्‍ये द्रगमूला भागात एका चौकीची तोडफोड केली.
लंगेटमध्‍ये पोलिस चौकीला आग लावली होती.
- परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍यासाठी पोलिसांनी अश्रू धुराचा वापर केला. यामुळे काही
लोक जखमी झाले आहेत.
- कुपवाडामध्‍ये जखमी असलेले जहांगीर अहमद वानी यांचा मृत्‍यू झाला आहे.
- प्रकरणात निष्काळजीपणा केल्‍याप्रकरणी ASI मो.रफीक यांना निलंबीत केले आहे.
- फुटीरतावादी नेता मीर वाइज उमर फारूखकडून शुक्रवारी नमाजनंतर पूर्ण काश्‍मीरमध्‍ये
आंदोलन करणार असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.
- यासीन मलिकने गुरुवारी पूर्ण काश्‍मीर बंदची हाक दिली आहे.
असा सुरू झाला वाद..
- हंडवारा येथे मंगळवारी काही लोकांनी लष्कराच्या एक जवानावर तरुणीची छेड काढल्याचा आरोप केला.
- संतप्त जमावाने दगडफेक केली. इतकेच नव्हे तर लष्कराचे एका बंकरमध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. यानंतर लष्कराच्या जवानांनी जमावावर गोळीबार केला.
- यात राष्‍ट्रीय पातळीवर खेळलेल्या एका क्रिकेटपटूसह तिघांचा मृत्यू झाला.
- नईम कादिर भट असे मृत क्रिकेटपटूचे नाव आहे.
- मृतांमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे.
- घटनेचे पडसाद श्रीनगरसह पुलवामामध्ये उमटले. पुलवामामध्ये दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे.