आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Her Husband\'s Hautatmya Deployed On The Border His Wife

नो निगेटिव्ह लाइफ : पतीच्या हौतात्म्यानंतर पत्नी सरहद्दीवर तैनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांसमोर आईची पासिंग आऊट परेड  ४१ वर्षीय रीना यांच्या तिन्ही मुलांनी पासिंग आऊट परेड कार्यक्रमात आईला सॅल्यूट करताना पाहिले. - Divya Marathi
मुलांसमोर आईची पासिंग आऊट परेड ४१ वर्षीय रीना यांच्या तिन्ही मुलांनी पासिंग आऊट परेड कार्यक्रमात आईला सॅल्यूट करताना पाहिले.
होशियारपूर- घराचा उंबरा ओलांडून देशाची सीमा गाठणाऱ्या तीन महिलांच्या या कथा आहेत. पतीच्या हौतात्म्यानंतर तिघींनी बीएसएफमध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला. वयाची चाळिशी अोलांडली, पण हाती बंदूक घेऊन शत्रूला कंठस्नान घालण्याची उमेद त्यांच्यात आहे. बीएसएफच्या खडका प्रशिक्षण शिबिरात ४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले. शनिवारीच पासिंग आऊट परेड झाली. सर्वांना आता तैनातीच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. या बेडर महिलांच्या कथा वाचा त्यांच्याच शब्दांत...

बीएसएफ नसते तर मीही नसते : रीना
सात वर्षांपूर्वी पती कमल सिंह यांच्या हौतात्म्याचे वृत्त कळले. तेव्हा ते त्रिपुरात होते. अायुष्यात काय उरले होते? सावरण्यासाठी वर्षे लागली. तीन मुले आहेत. किती वेळ रिकामी बसले असते? अखेर ४१ व्या वर्षी बीएसएफमध्ये येण्याची संधी मिळाली. हा अत्यंत कठीण निर्णय होता, पण बीएसएफने हिंमत दिली. त्यामुळे इथवर आले. जुने दिवस आठवताहेत. आनंदाचे हे क्षण कधी आयुष्यात येतील, असा विचारही केला नव्हता. मीही हे करू शकते, असे कमललाही कधी वाटले नसेल. - रीना रावत, उत्तराखंड

घर सांभाळले, आता सीमा सांभाळेन : अनिता
पती कर्ण सिंह यांचे छत्तीसगडमध्ये पोस्टिंग होते. नक्षली हल्ल्यात शहीद झाले. कुटुंबीयांवर डोंगर कोसळला. सांभाळणारे आणि कमावणारे कोणीच नव्हते. डोक्यावर तीन मुलांची जबाबदारी. बीएसएफ जॉइन करण्याचा निर्णय घेतला. सासू-सासऱ्यांनीही साथ दिली. आईची परेड पाहण्यासाठी युवराज व रितेश ही दोन्ही मुले आजी-आजोबांसोबत आली. घराची सेवा तर खूप केली, आता देशसेवेची वेळ आहे.
- अनिता अहलावत, गुडगाव