आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलीपाठोपाठ WWE मध्ये दुसरा भारतीय Wrestler, कोट्यवधी कमावणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - कुस्तीची आवड तर खूप होती, पण गावाता आखाडाच नव्हता. त्यामुळे बाघडू गावच्या सतेंद्र डागरने सर्वात आधी आखाडा तयार केला. त्यानंतर सतत परिश्रम करून एक, दोन नव्हे तब्बल तीन वेळा हिंद केसरीचा किताब जिंकला. आता तो वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजेच WWE च्या आखाड्यापर्यंत पोहोचला आहे. सतेंद्रचा तीन वर्षांचा करार झाला असून त्याला पाच कोटी रुपये मिळणार आहेत. अमेरिकेला पोहोचलेल्या सतेंद्रने त्यासाठी ट्रेनिंगही सुरू केली आहे.
डब्ल्यूडब्ल्यूईची टीम मुलाखतीसाठी चंदिगडला आली होती, त्यावेळी त्याचे शरीर पाहून ते प्रभावित झाले. त्यानंतर त्याला टेस्ट करण्यासाठी दुबईला घेऊन गेले. त्याठिकाणी दहा देशांचे पहिलावन होते. सलग सहा तासाच्या सरावाने त्याचा स्टॅमिना तपासण्यात आला.

पत्नीने आत्मविश्वास वाढवला
अमेरिकेहून फोनवर बोलताना सतेंद्रने सांगितले की, या यशामध्ये वडील वेदपाल डागर, भाऊ सुधीर आणि मित्रांनी त्याला सहकार्य केले. पत्नी जगजीत कौरने अत्यंत चांगल्या प्रकारे मानसिक सहकार्य करत आत्मविश्वास उंचावण्यासाठी मदत केल्याचेही त्याने सांगितले. तरुणांना प्रशिक्षणासाठी संघर्ष करावा लागू नये म्हणून लवकरच गावी परतून जागतिक स्तरावरील अकादमीची स्थापना करणार असल्याचे तो म्हणाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सतेंद्रचे PHOTO
बातम्या आणखी आहेत...