आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबातील महिलांवर होती वाईट नजर, मित्राचा खून करुन मृतदेह मगरींसमोर टाकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली (उत्तर प्रदेश) - घरातील महिलांवर मित्राची वाईट नजर असल्याचे लक्षात आल्यानंतर येथील एका प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने त्याचा खून करुन मृतदेह मगरीला खाऊ घातला. पोलिसांनी सोमवारी तीन आरोपींना अटक केली असून तिघांनीही गुन्हा कबूल केला आहे.

पोलिस अधीक्षक राजीव मल्होत्रा यांनी सांगितले, की अतुल पांडे ऊर्फ चिंटू बरेलीमधील सैनिकी कॉलनीत राहात होता. तो संजय आणि विक्कीसोबत प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करत होता. दोन्ही मित्र (संजय आणि विक्की) 21 एप्रिल रोजी चिंटूच्या घरी गेले आणि त्याला घेऊन बाहेर निघाले. त्यानंतर चिंटू घरी परत आला नाही. त्याच्या कुटुंबियांनी सुरुवातीला त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार इज्जतनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आणि नंतर त्याच्या दोन्ही मित्रांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिस अधीक्षक म्हणाले, चिंटूचा भाऊ कृष्णगोपालच्या तक्रारीवरुन क्राइम ब्रँचने या प्रकरणाचा तपास केला. पोलिसांना चिंटूची मोटरसायकल आणि मोबाइल जप्त केला होता. क्राइम ब्रँचने संजय आणि विक्कीसह रोहित ठाकूरला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.
आरोपींनी गुन्हा कबुल करताना सांगितले, की नदीमध्ये एका ठिकाणी मगरी असल्याचे आम्हाला माहित होते. चिंटूची हत्या केल्यानंतर मृतदेह आम्ही त्या ठिकाणी फेकून दिला. आरोपींनी सांगितले, की संजयच्या कुटुंबातील महिलांवर चिंटूची वाईट नजर होती. त्यामुळे संजयनेच त्याच्या हत्येचा प्लॅन तयार केला. संजयसह रोहित आणि विक्कीने गोळीमारून त्याचा खून केला आणि मृतदेह नदीत फेकून दिला.