मऊ (यूपी)- नेस्ले इंडिया कंपनी मागील शुक्लकास्ट कमी होण्याचे नाव घेत नसताना मॅगीनंतर आता पास्ता संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. पास्त्यात शिसे (लेड) निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्याचे चाचणीत समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील मऊ येथील अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी सांगितले की, लखनौ येथील स्टेट फूड अनॅलिसिस लॅबमध्ये जूनमध्ये पास्त्याचे नमुने पाठवण्यात आले होते. चाचणीत पास्त्यात शिस्याचे प्रमाण 2.5 पीपीएम निर्धारित करण्यात आले असताना नमुन्यात 6 पीपीएम आढळून आले आहे. मात्र, पास्ता शंभर टक्के सुरक्षित असल्याचा दावा नेस्ले इंडियाने केला आहे.
नेस्लेला एक महिन्याची मुदत
अन्न व औषध प्रशासनाने नेस्ले इंडियाला नोटिस बजावली असून एक महिन्यात या प्रकरणी उत्तर मागितले आहे.
पास्ता 100 टक्के सुरक्षित, नेस्लेचा दावा
दुसरीकडे, पास्ता शंभर टक्के सुरक्षित असल्याचा दावा नेस्ले इंडिया कंपनीने केला आहे.