आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Maggi Wadilal's Sample Also Result Negative

मॅगीनंतर वाडीलालचे नमुनेही "फेल', जयपूर आरोग्य विभागाची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - येथील आरोग्य विभागाने वाडीलाल आइस्क्रीमचे घेतलेले सहापैकी पाच नमुने चाचणीत फेल ठरले आहेत. कंपनीने आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीत ज्या घटकांचा समावेश असल्याचे सांगितले होते त्यापैकी बरेच घटक कृत्रिमरीत्या मिसळले असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. आइस्क्रीममध्ये फळांच्या रसाऐवजी इसेन्सचा वापर केला जात होता.

कंपनी ज्या पदार्थांचा वापर यात करत आहे तो आरोग्याला घातक ठरू शकतो, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या पदार्थांमध्ये रंगांची भेसळ, प्रथिनांचे आवश्यकतेपेक्षा अत्यल्प प्रमाण असे प्रकार आढळून आले. दरम्यान, या कंपनीवर जयपूरमध्ये कारवाई सुरू करण्यात आली अाहे. ११ ते २५ मेदरम्यान शहरात ही मोहीम राबवण्यात अाली होती. या पथकाने व्हॅनिला, बटर स्कॉच, वाडीलाल कुल्फीच्या वेगवेगळ्या बॅचचे नमुने घेतले होते. यातील पाच नमुन्यात हे घोटाळे दिसून आले.

अपाय काय?
इसेन्स व रंगांचा वापर केल्यामुळे ब्रेन ट्यूमर, ब्लड कॅन्सर, अॅलर्जी, थायरॉइडसह त्वचारोगाचाही धेाका संभवतो, असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक गर्ग म्हणाले.

अपायकारक नाही...
आरोग्य विभागाने घेतलेल्या नमुन्यांत अपायकारक कोणतेही घटक नाहीत. या नमुन्यांची पुन्हा एकदा दुसऱ्या प्रयाेगशाळेत चाचणी घेण्यात यावी, अशी विनंती आरेाग्य विभागाला केली असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिव्यांशू गांधी यांनी सांगितले.