आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईच्या वाढदिवशी मुलीवर अंत्यसंस्कार, ऑर्केस्ट्रात डान्स करून घर चालवत होती नेहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅथल/पतियाळा- नाभा तुरुंगातून कैदी फरार झाल्यानंतर गांगरलेल्या पोलिसांनी दहशतवादी समजून एका ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. त्यात 22 वर्षीय डान्सरचा मृत्यू झाला आहे. नेहा असे मृत तरुणीचे नाव आहे.

चिका रोडवरील धरमेेहडी गावाजवळील नाक्यावर इशारा करूनही चालकाने गाडी थांबवली नाही, असा पोलिसांचा दावा आहे. तर ऑर्केस्ट्रा ग्रुपचे मालक सर्वजित सिंह म्हणाले की, आम्ही गाडी पळवलीच नाही. साईडला घेऊन थांबवत होतो. तितक्यात पोलिसांनी गोळ्या झाडल्या. याच वेळी एक बाईकस्वारही जखमी झाला आहे.

नेहा ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये डान्सर होती. डान्स करुन धाकटा भाऊ आणि आईचे पोट भरत होती. दरम्यान, रविवारी सकाळी पतियाळामधील नाभा तुरुंगातील दोन दहशतवादी आणि चार गॅंगस्टर फरार झाले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. यादरम्यान अतिरेकी समजून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या डान्सरचा जागेवरच मृत्यू झाला.

आईच्या वाढदिवशीच नेहावर अंत्यसंस्कार...
- चिका रोडवरील धरमेहडी नाक्यावर इशारा करूनही चालकाने स्विफ्ट गाडी थांबवली नाही, असा पोलिसांचा दावा आहे.
- नेहाचे (डान्सर) वडील रमेशकुमार यांचे निधन झाले आहे. तिला एक धाकटा भाऊ आणि आई
आहे.
- वडिलांच्या निधनानंंतर संंपूर्ण कुटुंंबाची जबाबदाारी तिच्यावर होती. आर्केस्ट्रामध्ये डान्सर म्हणून काम करून ती घर चालवत होती.
- सोमवारी नेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज, तिच्या आईचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवशी मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नेहाच्या आईवर आली आहे.

वेडिंग फंक्शन अटेंड करण्यासाठी जात होती नेहा...
- नेहा एक वेडिंग फंक्शन अटेंड करण्यासाठी आपल्या आर्टिस्ट्स मित्रासोबत जात होती.
- सर्व स्विफ्ट गाडीत होते. अरमान इंटरनॅशनल आर्केस्ट्रा ग्रुपचे मालक सर्वजीत सिंग स्वत: कार चालवत होते. पोलिसांनी इशारा केल्यानंतर गाडी बाजुला घेऊन थांबवत होतो, तितक्यात पोलिसांनी गोळी झाडली. फ्रंट सीटवर बसलेल्या नेहाचा गोळी लागून जागेवरच मृत्यू झाला.

गोळी लागून बाइकस्वारही झाला जखमी...
- यादरम्यान पत्नीसोबत बाइकवर जात असलेल्या एका व्यक्तिलाही गोळी लागली. ब्रजमोहन असे या व्यक्तीचे नाव असून त्याचा पायाला गोळी लागली. पतियाळातील राजिंदरा हॉस्टिलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...