आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Namo Chai, Now A Namo Fish Stall In Chennai

प्रचार तंत्र: \'नमो चाय\'नंतर आता भाजपचे चेन्नईत \'नमो फिश स्टॉल\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी देशाभरात वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र आजमावले जात आहे. देशभरात 'नमो टी स्टाल' मोहीम राबवल्यानंतर आता चेन्नईतील मरिना समुद्रकिनारी मतदारांना आकर्षित करण्‍यासाठी 'नमो फिश स्टॉल' सुरु करण्‍यात आला आहे.

चेन्नईतील लाइट हाऊसमध्ये पहिल्या 'नमो फिश स्टॉल'चे उद्‍घाटन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे चालतेफिरते फिश स्टॉल असेल. या स्टॉलवर सर्व प्रकारच्या मासळ्या विक्रीसाठी उपलब्ध असतील. नरेंद्र मोदींच्या हाती मासळी असलेले पोस्टर या स्टॉलवर लावण्यात आले आहे. या स्टॉलला 'नमो फिश स्टॉल' असे नाव देण्यात आले असल्याची माहिती, राज्य मासेमारी शाखेचे अध्यक्ष एस. सतीश कुमार यांनी दिली.

'नमो फिश स्टॉल'वर पहिल्या दिवशी जवळपास 200 लोकांना मोफत मासळी वाटप करण्‍यात आली. यानंतर मासळी ठोक दरात विक्री करण्यात आली. शासकीय शॉपवर 'सी फिश' 650 रूपये प्रति किलो आहे. परंतु, नमो फिश स्टॉलवर ती 600 रुपये प्रति किलोप्रमाणे उपलब्ध असेल.

दरम्यान, तामिळनाडुमध्ये भाजपने कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही. तसेच पक्षाचाही फारसा प्रभाव नाही, अशा परीस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी राज्यातील समुद्रकिनार्‍यावर असलेले रामेश्वर, कन्या कुमारी, नागेर कोइल, नागा पट्टिनमसह अन्य भागात 'नमो फिश स्टॉल' मोहीम सुरु केली आहे.