आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Suicide A Failed Student Declared Passed Issue In Srinagar

आत्महत्येनंतर तो परीक्षेत पहिला, संस्थेच्या चुकीमुळे मोठा अनर्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- आवडत्या विषयात नापास झाल्यामुळे नाराज विद्यार्थ्याने झेलम नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. परंतु त्याच्या नातेवाईकाने गुणपडताळणी केली. तेव्हा तो वर्गात पहिला आल्याचे स्पष्ट झाले.

संस्थेच्या चुकीमुळे मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे संस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे अशा प्रकारची तक्रार आल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. श्रीनगरमधील या मुलाचे नाव अदनान गिल्कर असून तो भौतिकशास्त्र विषयात नापास झाला होता.

त्याचा निकाल पाहिल्यानंतर त्याने हे पाऊल उचलले होते. परंतु नातेवाईकांनी नंतर गुणांची फेरपडताळणी केली तेव्हा तो वर्गातून पहिला आल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या गलथानपणामुळे मुलाला प्राण गमवावे लागल्याचा आरोप गिल्करच्या वडिलांनी केला आहे.