पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे ट्रेंड अजून नेत्यांच्या लक्षात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही आघाडीतील प्रमुख पक्षांनी रणनीती बदलली आहे. शुक्रवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार असून सहा जिल्ह्यातील 32 जागांसाठी मतदान होणार आहे.
का बदलली रणनीती
>> पहिल्या टप्प्यात 49 जागांसाठी मतदान झाले. त्यात महाआघाडी (जेडीयू, आरजेडी, काँग्रेस) आणि एनडीएने (भाजप, एलजेपी, हम, आरएलएसपी) एकमेकांना जोरदार टक्कर दिली. कुठेच एकतर्फी मुकाबला झाल्याचे दिसले नाही.
>> भाजप आणि जेडीयूच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये जो फिडबॅक मिळाला त्यातही दोन्ही पक्षांना चित्र स्पष्ट झालेले नाही.
>> असे बोलले जात आहे की मतदाता यावेळी शांत आहे, त्यामुळे कोणालाच अंदाज वर्तवता येत नाही. याचा एक अर्थ मतदार हुषार झाला असाही घेता येईल, असे तज्ञ म्हणत आहेत.
>> पहिल्या टप्प्यात एकूण मतदान आणि महिलांच्या मतांच्या टक्केवारीत झालेली वाढ यामुळे सर्वच पक्षांच्या ह्रदयाचे ठोक वाढले आहे.