आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रद्युम्न हत्याकांड; 9 दिवसांनंतर शाळा सुरू; टीसीसाठी रांगा; आरोपींची न्यायालयात सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हत्येच्या 9 दिवसानंतर रेयान शाळा सुरु झाली आहे. - Divya Marathi
हत्येच्या 9 दिवसानंतर रेयान शाळा सुरु झाली आहे.
गुरुग्राम- रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्नच्या हत्येस ९ दिवस उलटून गेल्यानंतर सोमवारी शाळा सुरू झाली. या शाळेत १२०० हून अधिक मुले शिक्षण घेतात. सोमवारी  घाबरलेल्या अवस्थेत फक्त २५० मुले आली, तर प्रद्युम्नचे फक्त चार वर्गमित्र आले होते. त्याच्या वर्गात ४५ मुले होती. शाळेच्या प्रवेशद्वारावर साध्या वेशात पोलिस व शाळेतील शिक्षक उभे होते. या दरम्यान काही पालक मुलांची टीसी काढण्यासाठी आले होते. आमच्या मुलांना या शाळेत आता ठेवणार नाही, असे त्यांनी सांगितले.  

सकाळी सव्वासात वाजता शाळेत मुले दाखल होत होती. शाळा व्यवस्थापनाने रविवारीच मुलांना शाळेत पाठवण्याविषयी पालकांना कळवले होते. अनेक मार्गावर बस गेलेल्या नव्हत्या. तेव्हा मुलांना घेऊन पालक शाळेत आले. काही पालकांनी बस आली नसल्याची तक्रार केली. बसचे कर्मचारीही गणवेशात नव्हते. पालकांनी शाळेत जाऊन सुरक्षिततेचा आढावा घेतला. शाळेच्या बसेसमधून मुले खूप कमी संख्येने आली होती. प्रत्येक वर्गात केवळ ५ ते ८ मुले दिसली.  

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार  : सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी विनय प्रताप हे सोहना येथील सहायक जिल्हाधिकाऱ्यांसमवेेत शाळेत दाखल झाले. त्यांनी शाळेचा पदभार स्वीकारला. नऊ वाजता काही पालक मुलांना शाळेतून परत नेले. कारण त्यांना  हवी तशी सुरक्षितता नसल्याचे आढळले. पालकांच्या मनात भीती अजूनही कायम आहे. तसेच अर्धवट शाळा सोडण्यावरून पालकांतही संभ्रमावस्था आहे. जर परिस्थिती न सुधारल्यास इतर पर्यायाचा वापर करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकांची बैठक २३ सप्टेंबरला ठेवली असल्याची माहिती दिली.

दरम्यान, प्रद्युम्नचे पिता वरुण ठाकूर यांनी शाळा पुन्हा सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे. 
 
तीन आरोपींची न्यायालयात सुनावणी  
याप्रकरणी अटक करण्यात आलेले तीन आराेपी : कंडक्टर अशोक, रेयान शाळेच्या नाॅर्थ झोनचे प्रमुख आणि एक समन्वयक यांना गुरुग्रामच्या पाक्सो न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस तपासात अशोकला आरोपी करण्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशोकने वकील मोहित शर्मा आणि पत्नी ममता यांच्यासमोर आपण निर्दोष आहोत, असे म्हटले. पोलिसांनी मारहाण करून आपणास जबरदस्तीने गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, याच वर्गात शिकत होता प्रद्युम्न...
बातम्या आणखी आहेत...