आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Unnao 3000 Skeleton Found In Gorakhpur City

आता गोरखपूरमध्ये आढळले तीन हजार विसरा-मानवी सांगाडे, कुत्र्यांचे खाद्य बनले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर - उत्तर प्रदेशमध्ये शंभरावर मृतदेह आढळल्याच्या घटननंतर अशा प्रकारच्या घटना एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. गोरखपूर येथे पोस्टमॉर्टम हाउसच्या काही खोल्यांमध्ये प्लास्टीक आणि काचेच्या बाटल्यांमध्ये सुमारे तीन हजार विसेरा आणि मानवी सांगाडे मिळाले आहेत.
फोटो - रेल्वे स्टेशन रो़डजवळील जुन्या पोस्टमॉर्टम हाऊसजवळ मिळालेले मानवी सांगाडे.
याबाबत माध्यमांना माहिती मिळताच एका कर्मचार्‍याने हे सांगाडे आणि विसेरा जाळण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, लखनऊमध्येही 22 वर्ष जुने विसेरा कपाटांत पडून असल्याची माहिती समोर आली आहे.
गोरखपूरमध्ये 2006 साली पोस्टमॉर्टम हाऊस रेल्वे स्टेशन रोडहून मेडिकल कॉलेजमध्ये स्थलांतरीत झाले होते. सध्या त्याच ठिकाणी सध्या पोस्टमॉर्टम केले जाते. जुन्या पोस्टमॉर्टम विभागात काही हाडे आणि कवट्या तसेच विसेराचे नमुणे मोकळ्या मैदानात एका लाकडाच्या खोक्यात ठेवण्यात आले होते. पाऊस आणि थंडीमध्ये लाकडे सडल्यामुळे बॉक्समधील ही हाडे बाहेर आली. त्यानंतर भटकी कुत्री ते खाऊ लागली होती.
माध्यमांनी घटनास्थळी पोहोचून, सर्व कॅमेर्‍यामध्ये कैद करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी यासंदर्भात पोलिस प्रशासनाला माहिती मिळाली. प्रशासनाने त्यांच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने पुरावे जाळण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यावर पाणीही टाकण्यात आले.
पुढील स्लाइड्वर पाहा, PHOTO