आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afzal Guru Hanging Not Confidential; Union Government

अफझल गुरूच्या फाशीची माहिती गुप्त ठेवली नव्हती - केंद्र सरकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना फासावर लटकवण्यापूर्वी संबंधित राज्यांना त्याची अगोदर माहिती देण्यात येते. अफझल गुरूबाबतही तेच करण्यात आले. या प्रकरणात कोणतीही गुप्तता पाळण्यात आली नाही, असे केंद्र सरकारने मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले आहे.


अफझल गुरूला फासावर चढवण्याची प्रक्रिया गोपनीय पद्धतीने पार पाडण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिल्ली सरकारला अफझलच्या फाशीची कल्पना दिली होती. फाशी देण्याची प्रक्रिया तुरुंगातील नियमानुसार पूर्ण केली जाते, असा दावा गृहमंत्रालयाने केला आहे. दोषी कैद्याला फाशी कधी देण्यात येणार हा राज्य सरकारच्या अधिकारक्षेत्राचा विषय आहे. मात्र, फाशी तुरुंगातील नियमानुसारच दिली जाते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


राष्‍ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकारला फाशीची माहिती देण्यात आली, असे अतिरिक्त महाधिवक्ता पी. विल्सन यांनी न्यायालयाला सांगितले. न्या. इलिप धर्मा राव व न्या. एम. वेणुगोपाल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.


21 जूनपर्यंत पुढील सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे. राष्‍ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याची माहिती सार्वजनिक केल्याशिवाय दोषीला फाशी देण्यात येऊ नये, या आशयाची मागणी करणारी याचिका अ‍ॅड. पुगझेंधी यांनी दाखल केली आहे. या खटल्याच्या सुनावणीत केंद्राने आपली बाजू मांडली.