आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afzal Guru\'s Son Ghalib Topper In 10th Exam, At Jammu Kashmir

अफझल गुरुचा मुलगा झळकला मेरिट लिस्टमध्ये, व्हायचे आहे डॉक्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अफझल गुरुला फासावर लटकवण्यात आले होते. मात्र, त्याचा मुलगा गालिब अफझल मेरिट लिस्टमध्ये झळकला आहे. जम्मू-काश्मीर बोर्डतर्फे घेण्यात आलेल्या 10 वीच्या परीक्षेत गालिबने 500 पैकी 474 गुण ( 94.5 टक्के) प्राप्त केले आहेत. डॉक्टर होण्याची मनिषा गालिबने बालवयातच व्यक्त केली होती.

वडिलांनी गिफ्ट दिले होते पुस्तक व पेन...
अफझल गुरुला फाशी झाली तेव्हा गालिब खूप छोटा होता. तिहार तुरुंगात असताना तो आईसोबत वडिलांना भेटण्यासाठी जात असे. एकदा अफझल गुरुने गालिबला सायन्सचे पुस्तक व पेन गिफ्ट केला होता. गालिबने वडिलांसमोर डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

दरम्यान, आता आम्हाला शांततापूर्ण वातावरणात आयुष्य जगायचे असल्याचे अफझल गुरुची पत्नी तबस्सुमने हिने म्हटले आहे.

आईच्या अथक परिश्रमामुळे संपादन केले यश...
गालिबच्या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. सगळ्या विषयात त्याला 'ए' ग्रेड प्राप्त केली आहे. उत्तर काश्मीरमधील सोपोर येथे तो त्याच्या आईसोबत राहातो. गालिबला शिक्षण देण्यात त्याची आई तब्बसुम ही कोणतीही कसर सोडताना दिसत नाही. गालिबने चांगले शिक्षण घेऊन नाव उज्ज्वल करावे, अशी तब्बसुम हिची इच्छा आहे. अफझल गुरुने वैद्यकीय शिक्षण अर्ध्यात सोडले होते. सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होता. यादरम्यान तो देशद्रोही कारवाईत सहभागी झाला होता. त्याला वाचण्याचीही आवड होती. तिहार तुरुंगात असताना त्याच्या बॅरेकमध्ये अनेक पुस्तक होती.

पुढील स्लाइडवर पाहा, गालिबची मार्कशीट व फोटोज...