आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणामध्‍ये भर रस्‍त्‍यात पुन्‍हा सिने स्‍टाइल फायरिंग; गँगवॉर भडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंडाच्‍या एसयूव्‍ही गाडीवर लागलेली गोळी. - Divya Marathi
गुंडाच्‍या एसयूव्‍ही गाडीवर लागलेली गोळी.
पानीपत/सोनीपत (हरियाणा) - सोनीपत येथील गोहाना बायपास रस्‍त्‍यावर आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता गँगवार झाले. दोन वेगवेगळ्या एसयूव्‍ही गाडीमधून टोळ्यांनी रस्‍त्‍याच्‍या मधोमध गाड्या थांबवत एकमेकांवर तब्‍बल 15 राउंडची फायरिंग केली. त्‍यानंतर आपआपली गाडी जाग्‍यावरच सोडून ते पळून केले. यामध्‍ये किती गुंड जखमी झाले याचा आकडा कळाला नाही. पण, रस्‍त्‍याने जाणा-या तीन व्‍यक्‍तींना गोळी लागल्‍याने ते जखमी झाले. दोन्‍ही टोळ्यामिळून एकूण 15 गुंड असल्‍याचे प्रत्‍यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. यापूर्वी काल (बुधवारी) गुंडगाव येथेही अशाच प्रकारे फायरिंग झाली होती.
अशी घडली घटना
पोलिसांच्‍या माहितीनुसार, आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता गोहना बायपासवर एक एक्सयूव्‍ही गाडीने एका स्कॉर्पिओला धडक दिली. एक्सयूव्‍ही 10 जण होते कर स्कॉर्पिंयोमध्‍ये चार गुंड होते. धडक लागताच स्कॉर्पिओ पलटी होऊन पुन्‍हा सरळ झाली. त्‍यानंतर एक्सयूव्‍हीमध्‍ये असलेल्‍यांनी स्कॉर्पिंओतील गुंडावर फायरिंग सुरू केली. दरम्‍यान, त्‍यांच्‍याकडूनही तसेच उत्‍तर दिले गेले. एक गोळी एक्सयूव्‍हीच्‍या टायरमध्‍ये लागली. तरीही ते गाडी घेऊन पळून जाण्‍याचा प्रयत्‍न करत होते. दुस-या गँगने त्‍यांचा पाठलाग करत फायरिंग केली. यात एकूण गोळ्यांचे 15 राउंड चालले.
काल गुड़गावमध्‍ये झाली फायरिंग
काल (बुधवारी) सकाळी गुड़गावमध्‍ये एका मॉलजवळ एमजी मार्गावर सॅंट्रो कारमध्ये आलेल्या गुंडांनी एका एसयूव्ही गाडीवर फायरिंग केली. यात एसयूव्ही गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला होता. एक जण जखमी झाला आहे. फायरिंगनंतर अनियंत्रित झालेली एसयूव्ही एका रिक्षाला धडकली. यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन प्रवाशी जखमी झाले होते.
घटनेशी संबंधित फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा