आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Again Open Firing On Border, After Discussion Firing Stopped

सीमेवर पुन्हा गोळीबार; चर्चेनंतर फैरी थंडावल्या, जीवितहानी नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो)
जम्मू - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा नियंत्रण रेषा तसेच इंटेलिजन्स ब्युरोच्या तळांवर हल्ले करण्यात आले. मंगळवारी रात्री झालेल्या या गोळीबारात जीवितहानी झाली नाही. आयबीवर गोळीबाराच्या दोन फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर दोन्ही बाजूच्या अधिका-यांमध्ये सलग अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर गोळीबार थांबला.

पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये एलओसीवर रात्री नऊ वाजता गोळीबाराच्या फैरी झाडण्यात आल्या. रात्री १२ वाजेपर्यंत काही वेळेच्या अंतराने गोळीबार सुरूच होता. सकाळ होताच लष्करातील जवानांनी या परिसराला घेरून शोधकार्य सुरू केले. गोळीबाराच्या दहशतीत घुसखोरी करण्याचे अतिरेक्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. रामगड सेक्टरमध्येही बुधवारी पाकिस्तानकडून भारताच्या चौक्यांवर गोळीबार झाला. येथील बीएसएफचे जवान आयबीजवळ स्वच्छता मोहिमेवर होते.

काश्मिरात दगडफेक सुरूच
श्रीनगर |लष्कराच्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने काश्मिरात सुरू झालेली धुमश्चक्री बुधवारी दुस-या दिवशीही सुरूच होती. फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे बाजारपेठा बंद राहिल्या. रस्त्यांवर वाहतूकही तुरळकच होती. आंदोलकांनी सुरक्षा दलाच्या जवानांवरही दगडफेक केली. यात अनेक जण जखमी झाले.

नौगाम, खानयार, नोहाटा, एमआर गंज, रैनवारी, सफाकदलसह अनेक ठिकाणी संचारबंदीसारखी स्थिती होती. आंदोलकांनी रस्त्यांवर घोषणाबाजी केली. टायर जाळले आणि जवानांवरही दगडफेक केली. यात जवानांसह १२ ते १५ लोक जखमी झाले. दरम्यान, बडगामच्या पोलिस प्रमुखांनी सरकारला यासंबंधीचा अहवाल दिला आहे. तरुणांची कार विजेच्या खांबाला धडकली होती. या ठिकाणी फक्त एकच नाका उभारण्यात आलेला होता.