आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Pathankot : चकमक सुरूच, पाचवा दहशतवाद्याला कंठस्‍थान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट - येथील विमानतळातून आज (रविवार) सकाळपासून पुन्‍हा थांबून थांबून गोळीबार होत असून, भारतीय सुरक्षा दलाचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. दरम्‍यान, आज पुन्‍हा एक ब्‍लास्‍ट झाला असून, यात दोन जवान जखमी झाले त्‍यापैकी एक शहीद झाला. दुपारी एका दहशतवाद्याला कंठस्‍थान घालण्‍यात यश आले असून, अजून एक दहशतवादी विमानतळातून फायरिंग करत आहे. शनिवारी झालेल्‍या गोळीबारात सहा जवान शहीद झाले तर चार दहशतवाद्यांना कंठस्‍थान घालण्‍यात आले होते. दरम्‍यान, अजूनही विमानतळात दोन दहशतवादी असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.
ड्रोनच्‍या कॅमेऱ्यात दिसले होते दहशतवादी, डोभाल यांनी दिल्‍लीवरून पाठवले 150 कमांडोज...
- पठाणकोटमध्‍ये हल्‍ला करणाऱ्या दहशतवादी सर्वात अगोदर ड्रोनच्‍या कॅमेऱ्यात दिसले होते. शनिवारी सकाळी 3 वाजता घुसखोरी करत असताना ते दिसले होते.
- एक दिवसापूर्वी शुक्रवारी सकाळी गुप्‍तचर यंत्रणेला या बाबत माहिती देण्‍यात आली होती. पठाणकोट हल्‍ला थांबवण्‍यासाठी 150 ब्‍लॅक कॅट कमांडोजही पाठवले होते.
रविवारीचे अपडेट्स...
3.30PM: विमानतळाच्‍या आत असलेला आणखी एक दहशतवादी रविवारी मारल्‍या गेला आहे. शनिवारी चार दहशतवाद्यांना कंठस्‍थान घातले गेले होते.
------------
2.45 PM: दहशतवाद्यांच्‍या घुसखोरीवर गृहमंत्रलयाने बीएसएफला अहवाल मागितला.
------------
1.45 PM: डीआयजी (बॉर्डर) विजय प्रताप सिंह यांनी यांनी सांगितले की, विमानतळात अजून दोन दहशतवादी असून, ते गोळीबार करत आहेत.
------------
1.10 PM: आर्मीने पुन्‍हा शोध मोहीम सुरू केली आहे. दोन दहशतवादी अजूनही विमानतळात असल्‍याचे सांगितले जात आहे.
------------
12.02 PM: दहशतवादी हल्‍ल्‍यातील शहीद जवानांची संख्‍या सात झाली. आर्मीचे ले. कर्नल नीरंजन ई कुमार हे रविवारी आयडी ब्लास्टमध्‍ये शहीद झाले.
------------
12.02 PM: दहशतवादी हल्‍ल्यामध्‍ये शहीद झालेल्‍या जवानांची संख्‍या सातवर पोहोचली आहे. आर्मीचे ले. कर्नल निरंजन ई कुमार रविवारी आयडी ब्लास्टमध्‍ये शहीद.
------------
11.20 AM: पठाणकोटमध्‍ये शहीद जवानांची संख्‍या 6 झाली.
------------
10.19 AM: पठाणकोटमध्‍ये बॉम्‍ब निकामी करताना दोन जवान जखमी. प्रकृती धोक्‍याबाहेर.
------------
- 10.00 AM: राष्‍ट्रीय तपास संस्‍था (एनआयए) करणार पठाणकोट हल्‍ल्‍याचा तपास. संस्‍थेचे एक पथक घटनास्‍थळावर.
------------
- 9.30 AM: वायूदलाचे हेलिकॉप्टरही घिरट्या घालत आहे.
------------
- 9.20 AM: थांबून थांबून होत आहे गोळीबार
------------
- 9.10 AM: आर्मी आणि एनएसजी टीमने पुन्‍हा शोध मोहीम सुरू केली.
------------
- 9.00 AM: पठाणकोट विमानतळाच्‍या आत गोळीबार होत असल्‍याचे वृत्‍त. (कालची बातमी वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा)