आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Agitation Continue In Simandhra Part Against Telengana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमांध्र भागात वेगळ्या तेलंगणा राज्याच्याविरूध्‍द निदर्शने सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद/ गुवाहाटी - आंध्र प्रदेशच्या विभाजनावरून सोमवारीदेखील असंतोष दिसून आला. सीमांध्र भागात सलग सहाव्या दिवशीही अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. दुसरीकडे आसाममध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर काही भागात जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
अनंतपूर येथे सोमवारी मोठय़ा संख्येने नागरिक एकत्र आले होते. त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विशाखापट्टणम, चित्तूर, कनरुल जिल्ह्यांतसुद्धा रस्ता रोको, धरणे, मानवी साखळी अशा विविध मार्गाने सरकारचा निषेध करण्यात आला.

रस्त्यावर स्वयंपाक, धुणी !
नागरिकांनी आंदोलनाची तीव्रता अजिबात कमी होऊ दिलेली नाही. वेगवेगळ्या मार्गे सुरू असलेल्या आंदोलनासाठी नागरिक सहा दिवसांपासून रस्त्यावर आहेत. अनेकांनी तर रस्त्यावरच स्वयंपाक सामग्री मांडून आपला पोटोबो साधला. आंदोलनामुळे कपड्यांकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून काही निदर्शकांनी रस्त्यावर कपडे धुऊन , वाळवून निषेध सुरू ठेवला आहे.


बोडोलँडसाठी तोडफोड
आसाममध्ये वेगळ्या बोडोलँडसाठी राज्यात बंद सुरू आहे. त्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प होती. काही भागात बोडोलँड सर्मथकांनी दगडफेक, जाळपोळ केली. त्यात सरकारी मालमत्तेचे, वाहनांचे नुकसान झाले.