आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोट्या राज्यांसाठी आंदोलन पेटले, आंध्रात अखंड आंध्रसाठी नागरिक रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी / हैदराबाद - तेलंगणाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळताच देशभरातील स्वतंत्र राज्यांच्या मागणीला उधाण आले आहे. आसाममधील करबी प्रदेशाच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून त्यात एका विद्यार्थ्याचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यानंतर तेथे संचारबंदी लागू झाली आहे. दुसरीकडे गोरखालँड, ग्रेटर झारखंडची मागणीही जोर धरू लागली आहे. तर सीमांध्र प्रदेशात ‘अखंड आंध्र’चा नारा देत सलग दुसर्‍या दिवशी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले.

तेलंगणा राज्य निर्मितीनंतर आसाममधील करबी अँनगलाँग प्रदेशाला स्वतंत्र करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी बुधवारी रात्री दिफू भागात कारबी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. त्याचबरोबर या वेळी पोलिसांनी गोळीबारदेखील केला होता. त्यात राहुल सिगना नावाचा विद्यार्थी जखमी झाला होता. त्याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकूणच आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे कारबी सर्मथकात संतापाची लाट उसळली आहे. . या पार्श्वभूमीवर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कालच्या घटनेत इतर 19 जण जखमी झाले होते. त्यानंतर रात्रीपासूनच निमलष्करी दलास तैनात करण्यात आले आहे. आंदोलकांनी काँग्रेस खासदार बिरेनसिंग इंगती, आमदार बिद्यासिंग एंगलेंग यांच्या घरांवर हल्लाबोल केला. आंदोलकांनी तोडफोड केल्याने मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दिमा हसावो भागात बंद पुकारण्यात आल्याने गुरुवारी जनजीवन विस्कळीत झाले होते. बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, कार्यालये, पोस्ट ऑफिस, वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.


बेळगाव प्रश्नी केंद्राने तोडगा काढावा
अखंड आंध्रसाठी उग्र निदर्शने, अनेक भागांत उत्स्फूर्त बंद
आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याच्या निर्णयामुळे दुखावलेल्या लक्ष्मी पार्वतीं यांच्या डोळ्यात पत्रकार परिषदेतच अर्शू तराळले. आंध्र प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एन.टी.रामाराव यांच्या त्या पत्नी आहेत.
रायलसीमा आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागात अखंड आंध्र प्रदेशसाठी उग्र आंदोलने करण्यात येत आहेत. गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी अखंड राज्याच्या सर्मथकांनी ठिकठिकाणी रॅली व निदर्श्ेानांचे आयोजन केले होते. त्याचबरोबर या भागातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. कृष्णा, पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम, अनंतपूर भागात ही आंदोलने तीव्र झाली आहेत. विशाखापट्टणम भागात आंध्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे. काही भागांत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे 72 तासांचा बंद पाळला. शाळा-महाविद्यालये तसेच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बंद काळात अनंतपूरमध्ये काही पुतळ्यांची तोडफोड झाल्याचे वृत्त आहे. कृष्णा जिल्ह्यातील नुझीविद, तिरूवूर, जग्गैहपेट शहरात रास्ता रोको करण्यात आला. विजयवाडा-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर निदर्शकांनी गुरुवारी ठिय्या केला. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात बुधवारी केंद्रीय राखीव दल व पोलिस मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आले होते.

चार दिवसांचा बंद
दाजिर्लिंगमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर गोरखा जनमुक्ती मोर्चाने चार दिवसांचा बंद पुकारला आहे. शनिवारपासून हे आंदोलन सुरू होईल, तर हिल्स स्टेट डेमोक्रॅटिक पार्टीने 5 ऑगस्टपासून 100 तासांचा बंद पुकारला आहे.


‘ग्रेटर झारखंड’ची मागणी
तेलंगणा निर्मितीच्या दोन दिवसांनंतर झारखंड पीपल्स पार्टीने (जेपीपी) गुरुवारी ग्रेटर झारखंड वेगळा करण्याची मागणी केली. पुरूलिया, बांकुरा, मिदनापूर हे पश्चिम बंगालमधील जिल्हे, मयूरभनी, केओंझार, सुंदरगड, संबलपूर ही ओडिशातील जिल्हे तर छत्तीसगडमधील रायगड यांना मिळून ग्रेटर झारखंड असे स्वतंत्र राज्य तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.