आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबचे CM प्रकाशसिंग बादल यांच्यावर सभेत भिरकावला बूट; चष्मा तुटला, चेहऱ्याला जखम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्तसर - दहा वर्षांपासून पंजाबचे मुख्यमंत्री असलेले प्रकाशसिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीने बुधवारी बूट भिरकावला. त्यामुळे बादल यांचा चष्मा तुटला असून त्यांच्या चेहऱ्याला जखम झाल्याची माहितीही मिळाली आहे. त्यावेळा बादल यांच्या हातात पाण्याचा ग्लास होता. तोही खाली पडला. बूट फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बादल हे लंबी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही रविवारी झाला होता हल्ला.. 
- बादल लंबी विधानसभा मतदारसंघातील रत्ता खेडा गावात बुधवारी सकाळी प्रचारासाठी सुरू असलेल्या संगत दर्शन कार्यक्रमासाठी आले होते. त्याचवेळी त्यांच्यावर बूट भिरकावण्यात आला. 
- यापूर्वी बादल यांचा मुलगा आणि उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्या ताफ्यावर गेल्या रविवारी फाजिल्कामधील कंधवाला हाजर खां मध्ये दगडफेड झाली होती. 
- ताफ्यावर 15-20 तरुणांनी दगडफेक केली होती. गावातील काही लोकांना काही मुद्द्यांवर चर्चा करायची होती. पण त्यांचे म्हणणे ऐकले नाही, त्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर काही लोकांनी सुखबीरसिंग बादल यांच्या ताफ्यावर दगडफेकही सुरू केली. 

आधीही घडली होती घटना 
- मुख्यमंत्री बादल यांच्याबरोबर 2014 मध्येही अशी घटना घडली होती. त्यावेळी एका बेरोजगार व्यक्तीने त्यांच्याकडे बूट भिरकावला होता. बादल त्यावेळी एका राजकीय सोहळ्यात आलेले होते. 
- बूट फेकण्यापूर्वी त्याने घोषणाबाजीही केली होती. त्याने फेकलेला बूट मंचापर्यंत पोहोचलाच नव्हता. बादल यांनी मात्र त्या तरुणाला सोडले होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)