आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitators Showed Pakistani And IS Flags In Shrinagar

J&K : श्रीनगरमध्ये बकरीदच्या दिवशी दाखवले पाकिस्तान आणि IS चे झेंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये शुक्रवारी पुन्हा पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे दाखवण्यात आले. ईदगाह परिसरात बकरीदच्या नमाजनंतर गर्दीने पोलिस आणि सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. त्याच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या हिंसक आंदोलनात अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गर्दीत काही जणांनी भारत विरोधी घोषणाबाजीही केली.

आधीपासूनच होती शंका
जम्मू-काश्मीर सरकारने आधीच बकरीदच्या दिवशी अशा प्रकारचे वाद होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे काही फुटीरतावादी नेत्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आले होते.

कुर्बानीच्या जनावरांचे कातडे विकून दहशतवादासाठी फंडींग
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईद त्याच्या जमात-उद-दावा आणि लश्कर-ए-तोयबा संघटनेसाठी पैसा गोळा करत आहे. त्यासठी तो बकरीदला कुर्बानीनंतर कापलेल्या बकऱ्यांचे कातडे जमा करण्यासाठी जवळच्या गावांमध्ये माणसे नेमत आहेत. ही कातडी विकून तो मोठी रक्कम जमवण्याच्या विचारात आहे. एजंसींनी याबाबत अलर्ट जारी केला आहे. एका रिपोर्टनुसार गेल्यावर्षी जनावरांची कातडी विकून त्यांनी 35 कोटींपेक्षा अधिक रक्कम विकली होती.

बॅननंतर दुस-या मार्गाचा अवलंब
हाफीज सईदच्या संघटनेचे खाते सील केल्यामुळे सध्या तो इतर मार्गाने पैसे कमावण्याच्या प्रयत्नात आहे. हाफीज सईदच्या संघटनेला पाकिस्तान सरकारने वॉचलिस्टवर ठेवले आहे. कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अशा प्रकारच्या संघटना कातडी विकून पैसे जमवत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...