आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नी 4 ची यशस्वी चाचणी, लष्‍कराच्या शस्त्रागारात होणार समाविष्‍ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालासोर - अण्वस्त्रांनी सज्ज अशा अग्नी-4 क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण आणि संशोधन संस्थेच्या (डीआरडीओ) संशोधकांनी ओडिशाच्या व्हिलर बेटावरून सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी त्याचे प्रक्षेपण केले. हे क्षेपणास्त्र याच वर्षी लष्कराच्या शस्त्रागारात समाविष्ट करण्यात येईल. त्याचबरोबर त्याचे उत्पादनही सुरू करण्यात येईल, असे डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदर यांनी सांगितले.
* चीन, पाकिस्तान, रशिया आणि युरोपीय देशांना धक्का
* काय आहे वैशिष्ट्ये?
० हीट शील्ड : शस्त्राच्या चारही बाजूंनी उष्ण ढाल. 3000 अंश सेल्सियस तापमानाचा सामना करण्याची क्षमता.
० रिंग लेझर गायरो : स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान. त्यात लेझर फ्रिक्वेंसीच्या मदतीने वेग आणि दिशा दोन्ही परस्परांच्या सोयीनुसार बदलण्याची सुविधा.
० नेव्हीगेशन सिस्टिम : देशात तयार करण्यात आलेली मायक्रो-डिजिटल नेव्हीगेशन व्यवस्था. क्षेपणास्त्राला उपग्रहाच्या मदतीनेही नियंत्रित केले जाऊ शकते.
अग्नी श्रेणीतील क्षेपणास्त्रे
गत श्रेणीतील 3 क्षेपणास्त्राविषयी...
अग्नी 1
अग्नी 2
अग्नी 3
रेंज 700 2500 3000
क्षमता 1000 1000 1500
लांबी 15 20 16.3
चाचणीमध्ये नेमके काय झाले ?
हे क्षेपणास्त्र दोन टप्प्यातील आहे. पहिल्या टप्प्यात 30 किमी आणि दुस-या टप्प्यात 100 किमी उंचीवर वेगळे झाले. त्यात दोन मीटर लांबीचे अण्वस्त्र होते. हा भाग 850 किमी उंचीपर्यंतच्या उड्डाणानंतर 5 किमी/ सेकंदाच्या वेगाने पृथ्वीच्या वातावरणात पोहोचला.
मिनिटांत शत्रूला धडकी
क्षेपणास्त्रातील अण्वस्त्राचा वेग प्रतिसेकंद पाच किमी एवढा आहे. त्यानुसार 18 हजार किमी/ ताशी वेगाने वेध घेईल. अर्थात 4000 किमीवरील लक्ष्य केवळ 13.50 मिनिटात गाठेल.